रेशन कार्डसंबंधी प्रकरणे मार्गी लावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |

अमळनेरला दक्षता समितीच्या बैठकीत आ.चौधरींनी अधिकार्‍यांना खडसावले

 
जळगाव :
अमळनेर येथील तहसील कार्यालयात आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ. चौधरी यांनी विविध समस्यांबाबत प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरत रेशन कार्डसंबंधी सर्व प्रकरणे त्वरित मार्गी लावून गरीब व पात्र लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेतून घेऊन अन्न सुरक्षा योजनेंतर्गत त्यांना त्वरित धान्य उपलब्ध करावे, अशा सक्त सूचना दिल्या.
 
 
बैठकीत प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला आ. चौधरी यांनी अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. यावेळी सूचना करताना आ. चौधरी म्हणाले की, अनेक पात्र व गरीब कुटुंबे अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहेत. अशा लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेतून घेऊन त्यांना त्वरित धान्य वितरित करण्यात यावे. महिला बचत गटाची बैठक लावावी. ग्रामसभेचे पत्र देऊन तालुक्याचा इष्टांक पूर्ण करण्याच्या सूचना आ. चौधरी यांनी देत पुरवठा लिपिक अमोल पाटील यांना सूचना देऊन रेशन कार्डसंबंधी प्रकरण त्वरित मार्गी लावावेत, असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार डी. एम. वाडिले, पुरवठा कारकून नाना पाटील, गटनेते प्रवीण पाठक, आरिफ भाया, किरण गोसावी, उमेश पाटील, सुनील भामरे, अनिल महाजन, राजेंद्र पाटील, शेख जाकीर, सुशीला पाटील, सुरेखा पाटील, गिरीश पाटील, आनंद पवार, सुनील सोनवणे, आनंदसिंग पाटील, योगराज संदानशिव, गुलाब आगळे उपस्थित होते.
 
स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक लावून त्वरित कार्यवाही करावी. याव्यतिरिक्त उज्ज्वला गॅस योजनेची माहिती तालुक्यात देऊन लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात यावा. तसेच विभक्त व नवीन रेशन कार्ड लागलीच देण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानांच्या बाहेर कार्डधारकांची संख्या व माल विवरण माहिती फलक लावावे.आदिवासी बांधवांना त्वरित रेशन कार्ड देण्याची कार्यवाही करण्याची सूचना आ. चौधरी यांनी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@