पुष्पांजली प्रबाेधनमाला भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रमतीन शाळांमध्ये व्याख्याने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |
 

 
पुष्पांजली प्रबाेधनमाला 
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम
तीन शाळांमध्ये व्याख्याने

भुसावळ , २२ ऑगस्ट
शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने संदीप पाटील यांच्या माताेश्री पुष्पा पाटील यांच्या अाठवणी जपण्यासाठी तीन दिवसीय पुष्पांजली फिरती प्रबाेधनमाला यंदापासून सुरू केली अाहे. त्यात २३ अाॅगस्ट राेजी धरणगाव महाविद्यालयाचे प्रा. वा. ना. अांधळे हे प्रथम पुष्प गुंफतील.
 
विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन, मननाची गाेडी लागावी या उद्देशाने ही प्रबाेधनमाला सुरू हाेत अाहे. प्रथम पुष्प २३ अाॅगस्ट राेजी सकाळी ९ वाजता यावल तालुक्यातील भालाेद येथील कला, विज्ञान महाविद्यालयात गुंफण्यात येईल. यात धरणगाव महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा साहित्यिक वा. ना. अांधळे हे ‘काळजातल्या कवितांतून संस्कार पेरणी’ हा विषय मांडतील. अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा विद्यमान अामदार हरिभाऊ जावळे हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डाॅ. अजय काेल्हे, चाेपड्याचे नरेंद्र पाटील, शिवाजी पाटील, धनंजय पाटील यांची उपस्थिती राहील. दद्वितीय पुष्प २४ अाॅगस्ट राेजी सकाळी ९ वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या महात्मा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात गुंफले जाईल. धरणगावचे कवी डाॅ. संजीवकुमार साेनवणे हे ‘विद्यार्थी जीवन समृद्ध करणारा काव्यानंद’ हा विषय मांडतील. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालयाच्या अध्यक्षा वंदना भागवत पाटील या असतील. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील काळे, भालाेद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. जतीन मेढे, जळगावच्या बेंडाळे महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा भुसावळचे माजी नगरसेवक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, उडाण फाउंडेशनचे अध्यक्ष अशाेक निंबाळकर यांची उपस्थिती राहील.
प्रबाेधनमालेचे तृतीय पुष्प २५ अाॅगस्ट राेजी सकाळी ९ वाजता दीपनगरच्या श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयात गुंफले जाईल. चाळीसगावचे कवी मनाेहर अांधळे हे ‘दाेस्तांनाे साहित्याच्या प्रांतात फिरू या’ हा विषय मांडतील. अध्यक्षस्थानी श्री शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अार. एन. गाजरे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वयक अरुण मांडळकर, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप साेनवणे, ग.स.चे संचालक याेगेश इंगळे यांची उपस्थिती राहील.
या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे अावाहन अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील, समन्वयक ज्ञानेश्वर घुले, प्रकल्पप्रमुख संजय भटकर यांनी केले अाहे. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@