१०० कोटींचा निधी दिल्याने आमदारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |
 
 
 

१०० कोटींचा निधी दिल्याने आमदारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

 
जळगाव, २१ ऑगस्ट
 
जळगाव शहरच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला म्हणून जळगाव शहरचे आ. सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून आभार व्यक्त केले.
 
 
जळगाव महानगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली आहे. मनपामध्ये भाजपाला एकहाती सत्ता द्या , शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी आणू असा शब्द प्रचारसभांमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आ.सुरेश भोळे यांनी दिला होता. 3 ऑगस्ट मनपा निवडणुकिची मतमोजणी होवून नागरिकांनी भाजपाला स्पष्ट बहुमतात निवडून दिले.
 
जळगाव शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान महाअभियानांतर्गत प्रकल्पास तत्वतः मान्यता देवून १०० कोटींचा निधी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला होता. मंगळवारी आमदार सुरेश भोळे(राजुमामा), आ.चंदूभाई पटेल, आ.हरिभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री यांची मुंबई येथे भेट घेऊन आभार मानले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@