केशव उपाध्ये यांना पितृशोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |


 

 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये यांचे वडिल शामराव उपाध्ये यांचे मुंबईत मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. शामराव उपाध्ये हे सोलापूर येथे वास्तव्यास होते. तसेच एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचयाचे होते.

 

सोलापूर परिसरातील अनेक सार्वजनिक कामात त्यांनी पुढाकार घेतला होता. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ते मुंबईतील जेजे रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सकाळी ६.२० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावलली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शामराव उपाध्ये यांच्यावर सोलापुरातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@