ब्रेनडेड विवाहितेचे अवयवदान करण्याचा कुटूंबाचा निर्णयआदर्श विवाह केलेल्या परिवाराचा आणखी एक आदर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |
 
 
 

ब्रेनडेड  विवाहितेचे अवयवदान करण्याचा कुटूंबाचा निर्णय
आदर्श विवाह केलेल्या परिवाराचा आणखी एक आदर्श
 

जळगाव, 21 ऑगस्ट
ब्रेनडेड झालेल्या महिलेचे अवयवदान करुन गरजूंना जीवनदान देण्याचा महत्वाचा निर्णय माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनात जावळे कुटुंबियांनी घेतला 21 रोजी घेतला आहे.
भाजपाचे भुसावळ तालुका प्रमुख तथा वरणगाव नगरपालिकेचे स्विकृत नगरसेवक सुधाकर जावळे यांचे पुतणे सागर कडू जावळे यांच्या पत्नी प्रियंका सागर जावळे या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांचा मेंदू मृत झाला. त्यामुळे सागर जावळे, सुधाकर जावळे, योगेश जावळे, प्रियंका हिची आई व वडिल रविंद्र नामदेव वाघोदे रा.कंडारी आणि जावळे परिवाराने माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या मार्गदर्शनात अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयात किडनी, लिव्हर हे अवयव अत्यंत गरजू व्यक्तील दान करण्याचे ठरले. अवयवदान करण्याची प्रक्रिया सुरु असून बुधवार 22 रोजी किडनी आणि लिव्हर दान होणार आहे.
कुटुंबातील सदस्य आजारी असणे त्यातच त्याचा मेंदू मृत होणे यामुळे संपूर्ण कुटुंब तणावात येत असते. परंतु अशा कठिण परिस्थितीत जावळे परिवाराने माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंच्या मार्गदर्शनात अवयवदानाचा निर्णय घेतला असून त्यामुळे काही लोकांना जीवनदान मिळणार आहे.अवयवदानाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाने जावळे कुटुंबाने समाजात चांगला पायंडा पाडला आहे. सागर व प्रियंका यांचा विवाहसुध्दा आदर्श होता. साखरपूडयातच त्यांनी विवाह करुन आदर्श निर्माण केला होता. या परिवाराने आता अवयवदानाचा निर्णय घेतल्याने त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा तसेच अवयवदानाची माहिती जाणून घ्यावी अशी चर्चा सुजाण नागरिक करत आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@