अटलजींच्या साहित्यावर पीएचडी करण्यासाठी भाजपचे प्रोत्साहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या साहित्यावर ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची इच्छा असणाऱ्या राज्यातील १० विद्यार्थ्यांना लाख रूपयांचा अध्यसन नीधी भाजपतर्फे देण्यात येणार आहे. अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बुधवार दि. २२ ऑगस्ट रोजी एनसीपीए हॉलमध्ये अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील १३ विद्यापीठांमध्येअटल विद्यासन केंद्रसुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी २० कोटींचा नीधी देणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. केंद्र सरकारकडूनही मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव करण्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून अटलजींच्या एकंदरीत कारकिर्दीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

वाचनालयांच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लातूरमध्येही अटलजींच्या नावे १० कोटी रूपये खर्चून सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

राज्यातील १३ नद्यांमध्ये अस्थिविसर्जन

दि. २२ ऑगस्ट रोजी एनसीपीए सभागृहात अटलजींना श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील १०० नद्यांमध्ये आणि राज्यातील १३ नद्यांमध्ये त्यांचे अस्थिविसर्जन केले जाणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. याची जबाबदारी पदाधिकारी आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, . अड. आशिष शेलार हे त्यांचे अस्थिकलश दिल्लीहून मुंबईला आणणार असून नियोजित स्थळी पोहोचताना नागरिकांना गाडीतून त्याचे दर्शनही घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अटलजी राज्यात येत तेव्हा ते अनेकांना भेट देत होते. त्यामुळे त्यांच्या विचार आणि फटोरूपी आठवणींचे पुस्तक तयार करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच कोणत्याही व्यक्तीकडे त्यांच्याशा निगडीत आठवणी असतील तर त्या atlsmritigmail.com ईमेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@