हरवलेला सूर 'गब्बर' कधी शोधणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |



 

भारताचा धडाक्याचा सलामीवीर शिखर धवन देखील या पत्त्यांच्या बंगल्याचा भाग बनला आहे. गब्बर म्हणून ओळख असलेला शिखर कमी चेंडूत अधिक धावा करण्यात पटाईत आहे. मात्र आतापर्यंतच्या या दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याला सूर गवसलेला दिसत नाही, तो अजूनपर्यंत आपल्या कामगिरीला साजेशी खेळी करू शकला नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

सध्या भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर असून यामध्ये तो ५ कसोटी, ३ एकदिवसीय व ३ T२० सामने खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची अपेक्षित कामगिरी होताना दिसून येत नाही. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर पहिल्या दोन्ही कसोट्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोडला तर इतर खेळाडू पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे आपली विकेट सोडत आहेत. यात भारताचा धडाक्याचा सलामीवीर शिखर धवन देखील या पत्त्यांच्या बंगल्याचा भाग बनला आहे. गब्बर म्हणून ओळख असलेला शिखर कमी चेंडूत अधिक धावा करण्यात पटाईत आहे. मात्र आतापर्यंतच्या या दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याला सूर गवसलेला दिसत नाही, तो अजूनपर्यंत आपल्या कामगिरीला साजेशी खेळी करू शकला नाही.

 

शिखर धवनच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने कसोटी क्रिकेट सामन्यांमधील सहा शतके व पाच अर्धशतके केलेली आहेत. त्यामध्ये १९० धावांच्या सर्वोच्च खेळीचाही समावेश आहे. परंतु त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शिखरकडून अर्धशतक किंवा अर्धशतकाहूनही कमी धावा केल्या जात आहेत. ३०-४० धावा करून तो झटपट बाद होत आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांसारखी सातत्यपूर्ण कामगिरी, किंवा खेळपट्टीवर चिवटपणे टिकून खेळताना अत्यंत दुर्मिळ झाला आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. ५ दिवस चालणाऱ्या या खेळात शिखर सलामीला खेळायला येऊन सुद्धा एक दोन खराब फटके मारून लगेच आपली विकेट तो बहाल करताना दिसत आहे. त्यामुळे आता शिखरचा फॉर्म हरवत चालला आहे की काय? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना व त्याच्या चाहत्यांना पडू लागला आहे.

 

शिखर चांगला खेळत असून सुद्धा तो मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकत नाही. हे चित्र आता कसोटी सामन्यात हळूहळू दिसू लागले आहेत. यामुळे अनेकवेळा भारतीय क्रिकेट संघाला नुकसान भोगावे लागले आहे. सुरुवातीच्या दहा षटकात शिखर धवन आपल्या संघाला झटपट धावा काढून देतो. पण अतिघाई संकटात नेई म्हणतात ना, तेच खरे! याच अतिघाईच्या धावपळीमुळे तो स्वतःची विकेट गमावून बसतो. असे करण्याची शिखरची ही पहिलीच वेळ नव्हे, तर या गोष्टी शिखर धवनकडून यापूर्वीही वारंवार झाल्या आहेत. त्यामुळे यापुढे कसोटी क्रिकेटमध्ये जर तग धरून राहायचे असेल तर शिखर धवनने आपली कामगिरी सुधारण्याची अत्यंत गरज आहे. आपण केलेल्या अर्धशतकाचे शतक कसे होईल किंवा शतकाचे दुहेरी शतक कसे होईल, याचा शिखरने गंभीरपणे विचार करायला हवा. अन्यथा भारतीय क्रिकेट संघात जागा घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत हे शिखरने विसरता काम नये. त्यामुळे आता आपली विकेट कशी शाबूत ठेवायची हे त्याचेच ठरवायचे...!

 

- पराग गोगटे

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@