खाद्य तेल खरेदी करताना तुम्ही सावध असता का?कमी किमतीत होणार्‍या विक्रीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |
 
 
 
 

खाद्य तेल खरेदी करताना तुम्ही सावध असता का?
कमी किमतीत होणार्‍या विक्रीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

जळगाव, २1 ऑगस्ट
धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, आरोग्याची काळजी घेताना आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होऊन आपण घरात किंवा बाहेर तेलकट खाद्यपदार्थ खाण्यास पसंती देतो. परंतु, यामुळे आपल्या आरोग्याचा खेळखंडोबा होत असून आपले दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, आपण खात असलेले तेल हे शुद्ध आहे की अशुद्ध याबद्दल आता शंका निर्माण होत आहे.
 
 
भारतीय आपल्या भोजनात विविध खाद्यतेलांचा वापर करत असतात. खाद्य तेल हे शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, करडई, सूर्यफुलापासून बनविले जाते. मात्र यात कमी दरात अशुद्ध तेलाचा पुरवठा जास्त होत असल्याची शक्यता असल्याने गेल्या दोन ते तीन दशकांपासून देशात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. हृदयविकाराची अनेक कारणे असली तरी डॉक्टर रुग्णांना शेंगदाणा तेल वापरू नये, असा सल्ला देतात. दरम्यान कृषी, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात अनेक संशोधने झाली. आज जग झपाट्याने बदलत आहे. त्यात खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलसुद्धा बदलले आहे. फास्टफूडचे प्रमाण वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात तेल वापरले जाते. यामुळे तेल सवलतीच्या दरात विकले जाते. मोठमोठ्या मॉलमध्ये तेलाच्या दरात सूट दिली असल्याचे फलक लावले जातात. यात किरकोळ विक्रेतेसुद्धा पिछाडीवर नाही. येथेच फसवणूक होऊन अशुद्ध तेलाचा पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळली जातात का? अशी शंका निर्माण होते.
 
 
दरम्यान, बाजारात होलसेल भावाने शेंगदाणे खरेदी केले तरी ७० रुपये किलोपेक्षा कमी भावाने मिळत नाही. तर बाजारात शेंगदाणा तेल १०५ ते १२० रुपये किलो मिळते. शेंगदाण्याचे एक लिटर तेल गाळण्यासाठी किमान दोन किलो शेंगदाणे लागतात. त्यामुळे किमान १४० रुपयांचा कच्चा माल लागतो. तेल बनविण्यासाठी लागणार्‍या श्रमांचे मोल सोडले तरी पॅकिंग धरून १६० रुपये लिटर शुल्क पडते. परंतु बाजारात कमी किमतीने शेंगदाणा तेल उपलब्ध होते. ते कसे? याचा विचार ग्राहकांनी करायला हवा. हा प्रकार केवळ शेंगदाणा तेलाबाबतच नाही, तर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांबाबत होत असतो.
ग्राहकांना परवडते म्हणून ग्राहक मोठ्या आनंदाने खरेदी करतात. मात्र, यात काही अशुद्धपणा तर नाही? याची शक्यता पडताळून पाहायला पाहिजे. परंतु आरोग्य अधिकारी याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात. यातूनच अर्थव्यवस्था मजबूत होत असते. पण अप्रत्यक्षपणे अनेक विकार खाद्यपदार्थांच्या माध्यमातून नागरिकांच्या शरिरात प्रवेश करत असतात. यामुळे आरोग्य विभागाने बाजारात विक्री होत असलेले तेल हे शुद्ध आहे की नाही, याची शहानिशा करायला हवी, अशी इच्छा सामान्य नागरिकांकडून होत आहे.
 जास्त प्रमाणात सेवन केले जाणारे कोणतेही खाद्य तेल हे हृदयासाठी घातकच आहे. कमी तेलाचे पदार्थ आहारात असल्यास उत्तम. तेल खरेदी करताना आपल्या हृदयासाठी ते घातक ठरणार नाही, याची काळजी घ्यावी. डॉ. दीपक जावळे
 
 
 लाकडी घाण्यावर कच्च्या मालापासून तेल बनवले जाते. साधारणतः १ लिटर तेलासाठी सुमारे २ किलो कच्चा माल लागत असतो. त्यामुळे शुद्ध तेलाची किंमत बाजारात मिळणार्‍या तेलापेक्षा दुपटीपर्यंत असते. -
भूषण महाजन, हिरकणी लाकडी घाणा
 
@@AUTHORINFO_V1@@