आशियाई स्पर्धा : संजीव राजपूत याला रौप्य पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
इंडोनेशिया : नेमबाज संजीव राजपूत याने आज ५० मीटर पोझिशन ३ यामध्ये रौप्य पदक पटकाविले आहे. भारताच्या खात्यात आता रौप्य पदकांची संख्या ३ झाली आहे. आशियाई खेळांचा आजचा तिसरा दिवस असून रोज भारत पदकांची कमाई करीत आहे. संजीव राजपूत याला आज रौप्य पदक मिळाले असून आता भारताच्या खात्यात एकूण ९ पदकांची कमाई झाली आहे. यावर्षी भारतीय खेळाडू चांगले खेळाचे प्रदर्शन करतीय अशी आशा सगळ्यांना आहे. 
 
 
 
 
भारताला आत्तापर्यंत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदक मिळाले आहे. यावर्षी भारताला १५ पेक्षा जास्त सुवर्णपदक मिळवायचे आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी जोरदार तयारी करून आला आहे. आत्तापर्यंत भारतातील मुष्टियोद्धा विनेश फोगाट, नेमबाज दीपक कुमार, कुश्तीपटू बजरंग पुनिया, नेमबाज सौरभ चौधरी, नेमबाज अपूर्वी चंदेला आणि नेमबाज रवि कुमार यांनी आत्तापर्यंत पदकांची कमाई केली आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@