अखेर पत्री पूल पाडणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |


 

१०४ वर्षे जुना पूल पाडण्याची जबाबदारी रेल्वेकडे
 

कल्याण : ब्रिटीश राजवटीत बांधला गेलेला कल्याणमधील पत्री पूल अखेर पाडण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वी रेल्वे प्रशासन ,महापालिका प्रशासन आणि आयआयटीने केलेल्या सर्व्हेक्षणात मुंबईतील काही पुलांबरोबरच कल्याण येथील पत्रीपूल देखील धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचार्‍यासाठी वापरण्यास धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने रेल्वे प्रशासनाला दिला आहे . त्या अहवालानंतर हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मात्र हलक्या वाहनांची वाहतूक सुरूच ठेवण्यात आली होती .मात्र रेल्वे प्रशासनाने हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत .त्यामुळे सध्या हलक्या वाहनांसाठी वापरात असलेला हा पूल आता सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.शहरातील पूर्व व पश्‍चिमेस जोडणारा पूल तब्बल १०४ वर्षे जुना आहे. मात्र, या पूलाचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हा पूल धोकादायक असून या पूलावरची वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले होते. हा पूल लवकरात लवकर पाडण्याच्या सूचनाही कल्याण डोंबिवली महानरपालिकेला देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कडोंमपा मुख्यालयात सर्व विभागांची बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे, एमएसआरडीसी, कडोंमपा आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पत्री पुलावरील वाहतूक त्वरीत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच दि. २४ ऑगस्टपासून हा पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वेकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. एलफिस्टन पूल दुर्घटनेनंतर सर्व धोकदायक पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट त्यांवर कारवाई करण्यात आल्या.

 

यानंतर पुढच्या तीन महिन्यांत एमएसआरडीसी मार्फत हा पूल पुन्हा नव्यानं उभारला जाणार आहे. त्यामुळे कल्याण शहरातला हा ऐतिहासिक पत्री पूल आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. दरम्यान, पत्री पूल पाडल्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये याकरिता वाहतूकीचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@