जीवन कसे असावे हे अटलजींनी जगून दाखविले : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : माणसाचे जीवन कसे असावे हे भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनकाळातून आपल्याला दिसून येते असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.
 
 
 
 
जीवन किती मोठे आहे हे आपल्या हातात नाही मात्र जगणे कसे असावे हे आपल्या हातात त्यामुळे आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी जगून दाखविले आहे. तसेच त्यांनी शेवटपर्यंत भारत मातेची सेवा केली असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 
 
 
 
अटलजींनी आपल्या जीवनाला सुधारले आणि सामान्य जनतेसाठी त्यांच्या आनंदासाठी आपले जीवन व्यतिथ केले. त्यांचा आदर्श हा भारतीयांसाठी खूप मोलाचा आहे. इतक्या मोठ्या कालखंडामध्ये विरोधी पक्षात राहणे आणि आपल्या विचारांना दुषित होवू न देणे आपल्या विचारांवर ठाम राहणे हे खूप कठीण आहे मात्र राजकारणात राहून अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले खरे विचार आणि त्या विचारांमुळे आपली वेगळी प्रतिमा देशामध्ये कायम ठेवली असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
लोककल्याणाचे मुलभूत विचार आणि संसदीय लोकशाहीत केवळ राजकारणासाठी नाही तर ती देशातील नागरिकांसाठी आहे हे अटल बिहारी वाजपेयी यांनी पटवून दिले. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या देशाचा इतिहास जगला आहे. अणुचाचणीवेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात खूप मोठा निर्णय भारताने घेतला होता. त्यांचे त्यावेळीचे भाषण अजूनही भारतीयांच्या मनात आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे भारताची मान उंच झाली. त्यांचे स्वत:च्या विचारांवर अटल राहिल्याने देशात आपल्याला २० व्या शतकांत सन्मान मिळाला त्यांचे कार्य देशासाठी अद्वितीय आहे असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@