वनवासी विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |


 

उल्हासनगर : गेल्या काही वर्षांपासून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे तसेच धान्याची मदत करणाऱ्या उल्हासनगरातीलएक हात मदतीचाया संस्थेने महाड तालुक्यातील पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका वनवासी विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीसह संपूर्ण शिक्षणाचा संच-कपडे देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
 

पंधरा दिवसांपूर्वीएक हात मदतीचाया सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजय कदम हे त्यांच्या टीमसोबत महाड तालुका वरंध येथील आदिवासी वाडीत शिकणा ऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गेले होते. तेव्हा याच वाडीतील भारती मोरे ही विद्यार्थिनी दहावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असून तिला उच्च शिक्षणासाठी महाड तालुक्यातील ऋषीतंत्र विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, पण तिचे आईवडील भातशेतीत मजुरी करत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने भारती उच्च शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची माहिती वनवासी वाडीतील शिक्षक नामदेव सुतार यांनी होती.

 

सोमवारीएक हात मदतीचाया संस्थेच्या कार्यालयात पदाधिकारी तिचे आईवडील आणि शिक्षक दामोदर सोनार यांना बोलवून भारतीला प्रवेशासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@