हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई :  पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हा प्रकल्प मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत घेतला. महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेला आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणारा हा प्रकल्प आहे.
 
 
मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आदी यावेळी उपस्थित होते.
 
 
पुणे मेट्रो लाईन -३ प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा प्रकल्प असून तो सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविला जाणार आहे. यावेळी प्रकल्पाच्या निविदा अटी व शर्तींवर चर्चा करण्यात आली. प्रकल्प मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठवण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.
 
 
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाघोली बस डेपो निर्माण करण्यासाठी प्राधिकरणाच्या अखत्यारीतील मौजे वाघोली १४५८ व अन्य ठिकाणची ७६८६ चौ.मी. भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने यावेळी मंजुरी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन मंडळ यांनी चर्चा करून अटी व शर्तींबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
 
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकल्पाअंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पीपीपी अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या सदनिका प्राधान्यक्रमाने वितरित करण्यास मान्यता मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास विकासकांनी सकारात्मक सहभाग नोंदविला असून १४ विकासकांकडून २२ हजार घरांची निर्मिती होणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@