दाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण, पुण्यात 'जबाव दो' रॅलीचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |

 
 
पुणे :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी ५ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, अजूनही या हत्येसाठी दोषी असलेला व्यक्ती सापडला नाहिये. याच्या निषेधार्थ पुण्यात 'जवाब दो' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
 
या रॅलीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, मेघा पानसरे, शैला दाभोलकर, अतुल पेठे, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, सुभाष वारे, अजित अभ्यंकर यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
 
 
 
 
अंधश्रद्धेच्या विरोधात तसेच रुढी परंपरेच्या विरोधात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. मात्र अद्याप हत्येचा कट रचणाऱ्याचा शोध लागलेला नाही.
 
सध्या या प्रकरणात पोलिसांनी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. कळसकरला १० ऑगस्टला नालासोपारा येथून अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष सामील असल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध सुरू आहे. शिंदे पूल ते राष्ट्रसेवा दल कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@