होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे-भाग ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |


 

 

मागील दोन भागांमध्ये आपण होमियोपॅथीच्या मूलभूत तत्त्वांची माहिती घेतली. आजच्या भागातहीआपण अजून एक मूलभूत तत्त्व अभ्यासणार आहोत.
 

सूक्ष्ममात्रेचा नियम (low of minimum dose)

रुग्णाला जेव्हा होमियोपॅथीचे औषध दिले जाते, तेव्हा नुसत्या लक्षणांवरून किंवा चिन्हांवरून औषध शोधून चालत नाही, तर त्या औषधाच्या योग्य मात्रेशिवाय औषधाचा अपेक्षित गुण दिसत नाही. म्हणूनच होमियोपॅथीमध्ये यामात्रेचे महत्त्व आहे. याशिवाय औषधाचा अपेक्षित गुण दिसत नाही. म्हणूनच होमियोपॅथीमध्येसूक्ष्म मात्रादिली जाते. आता हीसूक्ष्म मात्राम्हणजे काय? तर औषधाचा डोस जो रुग्णाला दिला जातो, तो जरी कमी प्रमाणात दिला असला तरीही असे पाहिले जाते की, त्या मात्रेची शक्ती (potency) ही चैतन्यशक्तीला उत्तेजना देईल. म्हणजेच चैतन्यशक्तीला योग्य उत्तेजना मिळेल, इतकाच डोस हा रुग्णाला दिला जातो. औषधाचे प्रमाण (quantity) जरी कमी असले तरी दर्जाही (quality) उत्तम असतो योग्य असतो. यासूक्ष्म मात्रेच्या सिद्धांतावरूनच मग औषधनिर्मिती मात्रा निर्मितीच्या परिमाणाचा विचार सुरू झाला. कमीत कमी मात्रा, पण योग्य उत्तम दर्जाची देण्यामागे अनेक फायदे आहेत.

 

1. ‘सूक्ष्म मात्रेमुळे रुग्णाला कुठलेही दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत.

 

2. ‘सूक्ष्म मात्रे औषध दिल्यामुळे कुठल्याही प्रकारे लक्षणांमध्ये वा आजारात वृद्धी होत नाही.

 

3. औषधाची मात्रा शक्तिशाली असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीरातील कुठल्याही अवयवांवर त्या मात्रेचा विपरीत परिणाम होत नाही अवयवांचे नुकसान होत नाही. शिवाय औषधाचे दुष्परिणाम होत नाहीत.

 

सूक्ष्म मात्रेच्या या संशोधनाला काही विस्थापित नियमांमुळेही बळकटी मिळते.

 

ARNDT-SCHULTZ नियम : या नियमानुसारसूक्ष्म मात्राही शरीरातील पेशी तसेच मूळ ऊर्जा यांना उद्दीपीत करते रोगाशी प्रतिकार करण्यासाठी योग्य त्या प्रमाणात शक्ती प्रदान करते. ‘मध्यम मात्राही शरीराच्या पेशी नसांना कमकुवत करते त्यांची कार्यपद्धती ढासळते, तरजास्त मात्रा’ (लार्ज डोस) हा रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण करतो. म्हणूनच कमीतकमी प्रमाणात पण योग्य त्या शक्तीचे औषध जेव्हा होमियोपॅथीमध्ये निवडले जाते, तेव्हा ते सर्वप्रकारे रोग्याच्या रोगनिवारणाकरिता फायद्यासाठीच असते. थोडक्यात, हा नियम असे सांगतो की, एकाच औषधाच्यासूक्ष्मजास्त मात्रांचे परिणाम हे परस्पर विरोधी असू शकतात.

 

) लॉ ऑफ लिस्ट अक्शन : या नियमानुसार निसर्गामध्ये जर उचित बदल घडवायचा असल्यास कमीतकमी प्रमाणात उत्तेजना द्यावी. ही उत्तेजना देणारी गोष्ट कमीतकमी वासूक्ष्म मात्रेमध्ये असावी.जेणेकरून निसर्गाला धोका पोहोचविता उचित बदल चालू होण्याची प्रक्रिया सुरू होईल. निसर्गातही जेव्हा आपण वृक्ष लागवड करतो, तेव्हा पूर्ण झाड जमिनीत पुरत नाही, तर त्या झाडाचा सर्वात लहान भाग म्हणजेच बी पेरतो त्यानंतर त्याच्यामधून निसर्गात उचित सकारात्मक बदल होतात झाड उगवते. माणसाचे आरोग्य हे सुद्धा असेच निसर्गाच्या समतोलावर अवलंबून असते. म्हणूनच माणसाचे आरोग्य नीट राखण्यासाठी आपल्याला कमीत कमीमात्रेमध्ये फक्त उत्तेजना द्यायची असते. एकदा का चैतन्यशक्ती उचित योग्य प्रमाणात उत्तेजित झाली की, मग ही शक्ती आजाराला शरीराच्या बाहेर काढण्यास समर्थ असते. पुढील भागात आपण या मूलभूत तत्त्वांबद्दल अजून काही माहिती पाहूया.

 

-डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@