हार नही मानूंगा।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |



 

यश-अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत, अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे वगैरे सुवचने सुविचारापुरती अगदी तंतोतंत शोभतात. पण, प्रत्यक्षात या सुविचारांची सुयोग्य अंमलबजावणी करणे तितकेसे सोपे नाही. कारण, अपयशाने माणूस खचून जातो. एकदा-दोनदा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्या दाही अपयश पदरी पडल्यावर तो निस्तेज होतो. नाउमेदीने मनाचे दरवाजे बंद होतात. नैराश्यग्रस्त आयुष्यात सकारात्मकता दूर कुठे तरी निघून जाते. आपण पुन्हा कधी पायावर उभं राहूच शकणार नाही, ही नकारात्क भावना आत्मविश्वासाला पोखरुन काढते. आपसुकच मनाबरोबरही शरीरही हार मानू लागते. तेव्हा, हार मानता येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला धैर्याने-धाडसाने सामोरे जाण्याची वृत्ती विकसित करणे, हाच त्यावरचा मार्ग...
 
 

क्या हार में,

क्या जीत में

किंचित नहीं भयभीत मैं,

कर्तव्य पथ पर जो भी मिला

यह भी सही वो भी सही

वरदान नहीं मागूंगा।

हो कुछ पर हार नही मानूंगा।

 
 

देशप्रिय अटल बिहारी वाजपेयींच्या कविमनातून उभारलेली ही सुंदर रचना. आपल्या इहलोकीच्या जीवनात एकदा तरी हार अनुभवल्याशिवाय जगणे केवळ अशक्यप्राय आहे. कदाचित आपण हरता कामा नये, याची अजब काळजी घेणारी माणसे एकतर देव असतात किंवा आयुष्यात काहीच करता दगडासारखी बसलेली असतात. अगदी साध्यासरळ सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अशी माणसे जीवन जगतच नाहीत. आयुष्यात हार किंवा अपयश काय असते, हे खरे तर स्वत:च्या जीवनानुभवातून कळते. अर्थात, आपल्या प्रत्येकाचा अपयशाचा किंवा हार मानण्याचा मापदंड वेगळा असतो. कारण, आपली आयुष्याचीफिलॉसॉफीवा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. एखाद्याला हरण्याचा अनुभव आयुष्यात जगण्याचा धडा देऊन जातो. कधीकधी आपण दुसऱ्या कुणाचेहरलेलाम्हणून नामकरण करतो. पण, त्यांना मात्र त्या हरण्याची जाणीव नसते. कदाचित त्यांची स्वप्ने आकांक्षा ऐहिक पातळीवर जगण्याच्या इतरांसारखी नसतील किंवा हरण्याची भाषा त्यांनी स्वीकारलेलीच नसेल. अर्थात, सामान्यतः आपल्यालाहरण्याचे भयमात्र निश्चित वाटते. पण, ‘हरण्याचे भयवाटणारी माणसे त्या भीतीपोटीच आयुष्यात यशाच्या पथावर वाटचाल करू शकत नाही. हार मानणारी या जगात जास्त प्रमाणात आहेत. किंबहुना, हार मानणारी अटळ प्रवृत्तीची अटलजींसारखी माणसे या पृथ्वीतलावर विरळाच. पण, हार किंवा अपयशास घाबरणारी माणसे कशी असतात, हे समजून घेणे तसे खूप मनोरंजक आहे. माणूस म्हणून त्यांच्या स्वभावाची विशेषता काय आहे, व्यक्ती म्हणून असे काय गुणधर्म त्यांच्यात आहेत की ज्यामुळेहारत्यांना भयप्रद वाटते. क्लेशदायक वाटते.

 
 

अशा व्यक्ती आयुष्यात नवीन आव्हाने घेण्यास घाबरतात. नवीन गोष्टी करायला घाबरतात. कारण आपण हरलो तर काय होईल? ही भीती त्यांच्या मनात असते. या व्यक्तीच्या मनात स्वत:ची किंवा स्वत:बद्दलची एक गरीब-बिच्चारी अशी प्रतिमा असते. आत्मविश्वास कमी असतो. आत्मसन्मानही कमी असतो. मला कधीच एखादी गोष्ट करता येणार नाही किंवा एखादे यश मिळविणे, हे माझे काम नाही अशा प्रकारचे अव्यवहारिक संकुचित दृष्टिकोन या व्यक्तींमध्ये असतो. त्यामुळे भव्यदिव्य स्वप्न पाहणे, एखाद्या महत्वाकांक्षेची उंची गाठणे, त्यांना जमत नाही. या शिवाय या व्यक्तींमध्ये स्वत:ला विनाशाकडे घेऊन जायची प्रवृत्ती खास करून आढळते. त्यांच्या एकंदरीत जगण्याच्या शैलीवर आपण नजर टाकली, तर स्वत:ला विकासाकडे नेण्याची वृत्ती त्यांच्यात अभावानेच आढळते. एखाद्या कृतीने वा गोष्टीने आपला विकास होत असेल तर व्यक्ती ती कृती बाकीच्या थातुरमातुर गोष्टी टाळून पूर्ण प्रेरणेने ऊर्जेने करेल. पण, हार किंवा अपयशाला घाबरणारी माणसे नेमका विरुद्ध दिशेने प्रवास करतील. विकासाच्या शिखरावरच्या बुलंद वाटेवर चालता इकडे-तिकडे वेळ घालवतील वा टाळाटाळ करतात. त्यांच्या मनात प्रचंड बेचैनी असते. आपण हरलो तर काय गजब होईल, म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत. धोका पत्करायचा नाही. पुढची पायरी चढायचीच नाही, कारण घसरलो तर काय होईल? पण, या लोकांना एखादी गोष्ट सहजपणे यश मिळविता येण्यासारखी खात्रीची असेल, तरच ती करण्यात त्यांना रस असतो. एकंदरीत हार अनुभवण्यात घाबरणाच्या या माणसांना निर्भय व्हायची, गरज आहे. अटल बिहारी वाजपेयीजी म्हणतात तसे, ‘हार नही मानूंगा।म्हणणाऱ्या व्यक्तींची प्रेरणा अमर्याद असते. मन कणखर असते. स्वत:वरचा त्यांचा विश्वास बुलंद असतो. अशीच माणसे आकाशाला गवसणी घालण्याचे धाडस करतात. कारण त्यांना जमिनीवर पडण्याचे भय नसतेच.

 
 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@