स्तनपानातील ‘वीन ऑफ’चा टप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |


 

वीन ऑफअर्थात मुलाचे स्तनपान सोडण्याचा टप्पा मातांनुसार बदलू शकतो. उदाहरणार्थ, आई घरीच असेल तर ती बराच काळ बाळाला स्तनपान देऊ शकते. ती कामासाठी बाहेर जात असेल, तर स्तनपान सोडण्याचा टप्पा लवकर येतो. अर्थात, हा टप्पा निघून गेला तरी कदाचित तुमचे बाळ स्तनपानाची मागणी करत राहील. अशावेळी नेमके काय करावे, त्यासंबंधी माहिती देणारा हा लेख.....
 

आईचे दूध पोषणाने समृद्ध असते आणि त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा उत्तम होण्यास मदत मिळते. तसेचसडन इन्फन्ट डेथ सिन्ड्रोम’ (एसआयडीएस), मध्यकर्णाला (मिडल इअर) होणारा प्रादुर्भाव, मधुमेह यांपासून बाळाचे रक्षण होते. मानसिक आजार, दमा यांसारख्या आजारांचा धोका कमी करते. स्तनपानाचा मातेवरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे स्तनांच्या तसेच अंडाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयातून होणारा रक्तस्राव कमी होतो. वाढलेल्या कॅलरीज कमी होतात वगैरे...

 

जागतिक आरोग्य संघटनेने पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान द्यावे, अशी शिफारस केलेली आहे. त्यानंतर बाळाला पूरक अन्न सुरू करावे. तरीही बाळ किमान एका वर्षाचे होईपर्यंत स्तनपान सुरू ठेवावे. त्यानंतरही बाळ आणि आई दोघांनाही स्तनपान सुरू ठेवण्याची इच्छा असेल, तर बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत ते सुरू ठेवता येते.

 

वीन ऑफअर्थात मुलाचे स्तनपान सोडण्याचा टप्पा मातांनुसार बदलू शकतो. उदाहरणार्थ, आई घरीच असेल तर ती बराच काळ बाळाला स्तनपान देऊ शकते. ती कामासाठी बाहेर जात असेल, तर स्तनपान सोडण्याचा टप्पा लवकर येतो. अर्थात, हा टप्पा निघून गेला तरी कदाचित तुमचे बाळ स्तनपानाची मागणी करत राहील.

 

अशावेळी तुम्ही काही साध्या गोष्टी करू शकता:

1) तुम्ही बाळाला बाटलीऐवजी कपाने दूध प्यायला दिले, तर वीनिंगमधील स्थित्यंतर तुलनेने सोपे होऊ शकेल. स्तनपानावर असलेली मुले सहसा कपाने दूध पिणे सहज शिकतात. हे अगदी सहा महिन्यांपासून करता येईल. (वरचे दूध सुरू केले नसल्यास आईचे दूध काढून कपातून देता येईल.)

 

2)बाळाला कप किंवा बाटलीने दूध पाजण्याचे काम तुमच्या जोडीदाराला किंवा कुटुंबातील अन्य सदस्याला सांगा.

 

3)प्रथम त्याला दिवसातून एकदा स्तनपानाऐवजी वरचे अन्न द्या. ही वेळ बाळाची स्तनपानासाठी फारशी आवडीची नसेल, अशी निवडा. हे अन्न दुसऱ्या कोणालातरी भरवू द्या. आता तुम्ही आणखी वीनिंगसाठी तयार झाला असाल, तर स्तनपानाच्या त्या खालोखालच्या सर्वांत कमी आवडत्या वेळेला आणि यापूर्वी अन्न दिले होते, त्याच्या विरुद्ध वेळेला स्तनपानाऐवजी वरचे अन्न द्या. अशा पद्धतीने एका वेळी एका स्तनपानाच्या सत्राऐवजी वरचे अन्न देत राहा. वीनिंगचा वेग तुमच्यावर तुमच्या मुलावर अवलंबून आहे. मात्र, सामान्यपणे हे जेवढे संथगतीने होईल, तेवढे चांगले. भुकेच्या वेळी स्तनपानाऐवजी वरचे अन्न देण्याची वारंवारता वाढवताना प्रत्येक वेळेत काही दिवस जाऊ द्या.

 

4) जेवणाच्या वेळी तुम्ही बाळाला देत असलेल्या संकेतांकडे बारीक लक्ष ठेवा. उदाहरणार्थ, तुम्ही बाळाला अंगावर पाजण्यासाठी बसत होतात, त्याच खुर्चीत बसून त्याला वरचे अन्न द्याल, तर बाळ स्तनपानाचीच मागणी करेल अशी दाट शक्यता आहे. कप देऊन किंवा कुरवाळून त्याचे समाधान होणार नाही.

 

5) मुलाला त्याचे लक्ष वेधून घेतील, चव विकसित होण्यास मदत करतील, असे घट्ट पदार्थ खाण्यासाठी द्या. आता मूल स्तनपानाची मागणी करणार असा अंदाज आला की त्यापूर्वीच त्याच्यासमोर हे खाणे ठेवा.

 

6) मुलाला भरवताना हातावर घेऊ नका. त्याला धरण्यासाठी दुसरी पद्धत वापरा.

 

7) बाळाला स्वत: झोपवणे टाळा, ही जबाबदारी तुमच्या जोडीदारावर किंवा कुटुंबातील अन्य सदस्यावर सोपवा.

 

8) मुलाला कप खरेदी करण्यासाठी सोबत घेऊन जा आणि त्याला समजावून सांगा की, आता ते मोठे झाले आहे. बाळ राहिलेले नाही. आईचे दूध फक्त लहान बाळे पितात आणि ते आता मोठे झाले आहे, हे स्पष्ट करून सांगा.

 

9) स्तनपान देता त्याला शक्य तेवढे वारंवार कुरवाळा आणि त्याचे पापे घ्या. म्हणजे तुमचे त्याच्यावर प्रेम आहे, ही जाणीव त्याला कायम राहील.

 

10) तुमच्या मुलाला सुरक्षित वाटावे, यासाठी त्याच्यासोबत गेम्स खेळा किंवा खेळण्याच्या मदतीने त्याचे लक्ष अन्यत्र वळवा. त्याला जेव्हा स्तनपानाची तीव्र इच्छा होईल, तेव्हा एखादे गाणे म्हणून तुम्ही त्याला शांत करू शकता किंवा झोपताना गोष्ट सांगणेही उपयुक्त ठरते.

 

बाळाचे स्तनपान बंद करण्याच्या टप्प्यात स्वत:च्या आरोग्याची आणि आरामाचीही काळजी घ्या

 

1) वीनिंगच्या काळात तुम्हाला स्तनांमध्ये अवघडलेपण वाटत असेल, तर आवश्यक तेवढे दूध पिळून काढा म्हणजे तुम्हाला आराम वाटेल.

 

2) असिटॅमिनोफेन किंवा आयब्युप्रोफेनसारखी प्रिस्क्रिप्शनशिवाय घेण्याजोगी औषधेही उपयुक्त ठरू शकतात.

 

3) स्तनांवर कोल्ड कॉम्प्रेसेस किंवा जेल पॅक्स लावल्यानेही आराम मिळतो.

 

4) वीनिंग काळात स्तन बांधून ठेवू नये किंवा आहारातील द्रवपदार्थांचे प्रमाण कमी करू नये.

 

5) गुठळी तयार होत नाही ना, याची खात्री करण्यासाठी स्तन नियमितपणे तपासून बघा. स्तनांवर टणक पण मऊसर भाग जाणवल्यास लक्ष ठेवा आणि डॉक्टर किंवा लॅक्टेशन कन्सल्टंटना भेटा. स्तनपान अचानक सोडल्यास या समस्या येण्याची शक्यता अधिक असते.

 

6) वीनिंग काळात ब्रेस्ट पॅड्स उपयुक्त ठरतात.

 

7) स्तनांना आधार राहावा, म्हणून पुरेशी घट्ट ब्रा वापरा.

 

- डॉ अस्मिता महाजन

@@AUTHORINFO_V1@@