घृष्णेश्वर विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |

 ११२ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता : सुधीर मुनगंटीवार

 
 
 
मुंबई : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे असलेल्या श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या ११२ कोटी ४१ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा आराखडा शिखर समितीच्या मान्यतेने नियोजन विभागामार्फत राबविण्यात येईल, अशी माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
 
श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर हे महत्वाचे ज्योतिर्लिंग असून या तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी विकास आराखडा सादर केला होता. त्यास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने ७ मार्च २०१८ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
 
 
औरंगाबादचे जिल्हाधिकारी हे या आराखड्यातील कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या आराखड्यातील काही कामास तांत्रिक मान्यता देताना स्थानिक परिस्थितीनुसार त्यात अंशत: काही बदल किंवा सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीस अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@