पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |


पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून आज पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून ठिय्या आणि घंटानाद आंदोलन केले जात असून मराठा समाजातील नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील मराठा समाजाकडून केले जात आहे.

आज सकाळी ८.३० वाजल्यापासून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सर्वात प्रथम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडून घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्या, तसेच मराठा युवकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्या, असे म्हणत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यानंतर हा मोर्चा खासदार वंदना चव्हाण आणि त्यानंतर दिलीप कांबळे यांच्या घराच्या दिशेने जाणार आहे. त्याठिकाणी देखील मराठा समाजाकडून ठिय्या आणि घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून यामुळे दोन्ही नेत्यांच्या घरासमोरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये  वाढ करण्यात आली आहे.


@@AUTHORINFO_V1@@