मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |


मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व भाजप आमदारांची आणि मराठा समाजातील मान्यवरांची तातडीने बैठक बोलावली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठक होणार आहे.
राज्य सरकारमधील सर्व मंत्री तसेच भाजप आमदार यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील मराठा समाजातील काही महत्त्वाच्या मान्यवरांना चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी सध्या सरकारची भूमिका आणि परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मराठा समाजातील मान्यवर या बैठकीला उपस्थित राहणार का विषयी मात्र अजून शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या रविवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार नारायण राणे यांनी अशाच प्रकारे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मुंबईमध्ये बैठक घेतली होती. परंतु या बैठकीने प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न अधिकच गंभीर बनला. त्यातच समन्वयकाची नावे गुप्त ठेवल्यामुळे आणि चर्चेतील मुद्दे उघड न केल्यामुळे मराठा समाज अधिकच आक्रमक झाला होता. त्यामुळे मराठा समाजातील मान्यवर या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येणार का ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@