१२३ वे घटनादुरुस्ती विधेयक २०१७ राज्यसभेत पारित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक २०१७ आज राज्यसभेत पारित करण्यात आले आहे. आज सकाळी या विधेयकावर चर्चा सुरु करण्यात आली आणि या चर्चेदरम्यानच हे दुरुस्ती विधेयक पारित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी गेल्या वर्षी ५ एप्रिल २०१७ ला हे विधेयक लोकसभेत सादर केले होते. 
 
 
हे दुरुस्ती विधेयक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग याप्रमाणे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग याला देखील घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात आहे. या दुरुस्ती विधेयकात सभागृहाच्या सदस्यांनी सुचवलेल्या काही सुधारणांसह हे विधेयक आज राज्यसभेत पारित झाले.
 
 
१२३ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आता लोकसभेत चर्चा सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक पारित झाल्यास मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@