एस सी / एस टी विधेयक या सत्रातच पारित होणार : राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : एसटी/एससी विधएयक म्हणजेच ऑट्रॉसिटी कायद्यावरुन पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. न्यायालयाने या विधेयकातील तरतूदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर याविषयी संसदेत सुद्धा चर्चा सुरु झाली आहे. " हे विधेयक याच सत्रात लागू करण्यात येईल" असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
 
 
काँग्रेस नेते मल्लिकार्जुल खर्गे यांनी हे विधेयक लवकरात लवकर पारित करण्यात यावे अशी मागणी केली होती. तसेच "सरकारने आतापर्यंत वेगवेगळ्या ६ विषयांवर अध्यादेश काढला आहे, मात्र याविषयार आतापर्यंत सरकारने काहीच केले नाही." असे म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
 
"कालच केंद्रीय मंत्रीमंडळानी यासंबंधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. याच सत्रात हे विधेयक लागू करण्याची या सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकार कार्यरत आहे." असे म्हणत राजनाथ सिंह यांनी सरकाची बाजू स्पष्ट केली.
@@AUTHORINFO_V1@@