पोर्टेबल ब्लड ऑनॉलायझर या उपकरणाचे महापौरांच्या हस्ते अनावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |


 

एकाच उपकरणाच्या माध्यमातून होणार अत्यावश्यक रक्ततपासण्या
 

ठाणे : रुग्णालयात रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी इतरत्र जावे लागते. मात्र आता पोर्टेबल ब्लड ऑनॉलायझर या उपकरणाच्या माध्मयातून अगदी २ ते १० मिनिटात २५ रक्त तपासण्या करता येणार आहे. या पोर्टेबल ब्लड ऑनॉलायझर या उपकरणाचे अनावरण आज महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे, उपविभागप्रमुख राजेंद्र शिंदे, एन्झाईम हेल्थकेअरचे चंद्रेशखर आर दुबे आदी उपस्थित होते.सदरचे उपकरण हे कंपनीच्यावतीने महापौरांना भेट देण्यात आले, परंतु रूग्णांच्या सेवेसाठी हे उपकरण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी सुपुर्द केले असल्याचे महापौर मिनाक्षी शिंदे यांनी नमूद केले.

 
 

रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व अत्यावश्यक तपासण्या करता याव्यात यासाठी एन्झाईम हेल्थकेअर या कंपनीने हे उपकरण आणले आहे. हे उपकरण सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन केले जाणार असून त्या माध्यमातून इलेक्ट्रोलाईट, बायोकेमेस्ट्री, कोऑग्युलेशन, कार्डिऑक्ट मार्कर, हिमॉटोलॉजी आदी विविध अशा २५ रक्ततपासण्या करता येणे शक्य असल्याचे एन्झाईम हेल्थकेअरचे चंद्रेशखर आर दुबे यांनी नमूद केले. तसेच या मशीनच्या माध्यमातून आजारांचे निदानही केले जाणार आहे. या सर्वामध्ये रुग्णांचा वेळ वाचणार असून ठाण्यातील सर्वच रुग्णालयात हे उपकरण उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@