जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू जम्मू : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांना हे यश हाती आले आहे.
 
 
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये देखील काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळाले होते. अनंतनाग या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आणि या चकमकीत या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 
 
 
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देखील सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले होते. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. सध्या हंदवाडा, अनंतनाग, पुलवामा या भागांमध्ये सुरक्षा रक्षक चोख बंदोबस्त ठेवत आहेत. दहशतवादी कधीही हल्ला करत असल्याने सुरक्षा रक्षकांना तयार राहावे लागते. 
 
@@AUTHORINFO_V1@@