हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार सामना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
लंडन : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा लंडन येथे सुरु असून उपांत्यपूर्व फेरीत आजचा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार असून दुसरा सामना नेदरलँड्स आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. काल भारताने इटलीवर प्लेऑफ सामन्यात मात करत अंतिम आठमध्ये जागा बनविली असून आता आज भारत आयर्लंड विरुद्ध सामना खेळणार आहे. 
 
 
 
 
भारतीय महिला संघाने इटलीला ३-० अशा गोल संख्येने मागे टाकले. इटलीला या सामन्यात गोलाचे खातेच उघडू न देता भारताने अतिशय चांगला खेळ खेळत हा सामना आपल्या नावावर करून घेतला. त्यामुळे आता भारताने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी धडक मारली असून आता आज काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
तर दुसरा सामना नेदरलँड्स आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ अतिशय ताकदीचे असल्याने या दोघांमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@