सुषमा स्वराज मध्य आशियाई देशांच्या दौऱ्यासाठी रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |


नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या आजपासून मध्य आशिया खंडातील तीन देशांच्या दौरासाठी रवाना झाल्या आहेत. आपल्या या चार दिवसाच्या दौऱ्यादरम्यान स्वराज या मध्य आशिया खंडातील कझाकस्तान, किर्गिझस्तान आणि उझबेकिस्तान या तीन देशांचा दौरा करणार असून या तिन्ही देशांच्या प्रमुखांच्या भेटी देखील त्या घेणार आहेत.

आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये स्वराज या कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे जाणार आहेत. याठिकाणी कझाकस्तानचे राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्र्यांची त्ये भेट घेणार आहेत. त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर अस्ताना येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होणार आहेत. तसेच अस्तानातील भारतीय नागरिकांशी देखील त्या संवाद साधणार आहेत. यानंतर स्वराज या अनुक्रमे किर्गिझस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांना भेट देणार आहेत. याभेटीमध्ये देखील त्या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच याठिकाणी आयोजित काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे स्वराज यांचा या तिन्ही देशांचा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे भारतच्या परराष्ट्र हिताच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


@@AUTHORINFO_V1@@