‘अॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्स’ विषयावरील अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |

हा अभ्यासक्रम चालवणारे देशातील दुसरेच विद्यापीठ

 

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेऊन अॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्स याविषयी नवीन वैकल्पिक अभ्यासक्रम संख्याशास्त्र विभागात सुरू केला आहे. खगोलशास्त्र (astronomy), खगोलभौतिकशास्त्र (astrophysics) आणि मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या संख्यात्मक माहितीचे संगणकाच्या सहाय्याने विश्लेषण (big data computation) करण्यासाठी विद्यापीठ विद्यार्थ्यांकरिता या अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. असा अभ्यासक्रम असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशभरात दुसरे विद्यापीठ ठरले आहे, अशी माहिती संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. टी. व्ही. रामनाथन यांनी दिली.
 
या आधी कलकत्ता विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी संख्याशास्त्र विभागाला विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन (सी.एम.एस.) तसेच, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) तसेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) या संस्थांचे विशेष सहकार्य असणार आहे.
 
अलीकडे आढळलेल्या गुरुत्वीय लहरी, खगोलशास्त्र (astronomy), खगोलभौतिकशास्त्र (astrophysics) संदर्भातील नवीन घडामोडी यांविषयी शास्त्रज्ञ व संशोधकांना सातत्याने वेगळी माहिती मिळत आहे. इस्रोच्या चांद्रयान आणि मार्स आर्बिटर मिशन या मंगळ मोहिमेविषयी भारतात आकर्षण निर्माण झाले आहे. या मोहिमांमधून सातत्याने नवीन माहिती उपलब्ध होत आहे. विश्वातील अगणित रहस्यांविषयी हाती येत असलेली निरीक्षणे पाहता त्या माहिती व निरीक्षणांचा संख्याशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने या माहितीचे विश्लेषण करता येईल, या विचाराने हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठातील संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स), सेंटर फॉर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन (सी.एम.एस.) आणि गणितशास्त्र विभागातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
 
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र या विषयांसंदर्भात आतापर्यंत उपलब्ध माहितीवर विश्लेषणात्मक काम करण्याची संधी भविष्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@