बंगालचे मोकळे मन काय सांगते?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

 
परवा बंगालचे दोन संघ प्रचारक मुंबईहून हावड्याला जाणार होते. आधी परिचय असल्यामुळे भेटण्यासाठी मला फोन आला. मी त्या दोघांसाठी जेवण घेऊन नागपूर रेल्वेस्थानकावर गेलो होतो. गाडी 20 मिनिटे आधी आली. त्यामुळे अर्धा तास छान गप्पा झाल्यात. डब्यात त्यांचे चार सहप्रवासीदेखील हावड्यालाच जाणारे होते. चारही पंचेविशीतील तरुण होते. त्यांच्याशी बोलण्याच्या ओघात समजले की, ते नुकतेच रेल्वेत नोकरीला लागले होते आणि मुंबईला प्रशिक्षण आटोपून परत जात होते. मी सहज प्रश्न विचारला. लाच किती दिली? ते म्हणाले, एकही पैसा नाही. मला खरे वाटेना. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही खरे सांगितले तरी माझ्यापासून धोका नाही. मी तर तुम्हाला ओळखतही नाही. त्यावर ते म्हणाले की, लाच दिलीच नाही तर काय सांगू? मला सुखद धक्का बसला. या चार जणांचे कुटुंबीय, शेजारपाजार, मित्र, नातेवाईक या सर्वांपर्यंत हा संदेश तर नक्कीच गेला असणार की, मोदींच्या काळात नोकरीसाठी लाच घेतली जात नाही. वृत्तपत्रात आणि टीव्हीत कितीही आणि काहीही येत असले असले, तरी प्रत्यक्ष सांगण्यावर लोकांचा अधिक विश्वास असतो. बंगालच्या लहान-लहान गावातले हे चौघे होते. दोघे 24 परगणा जिल्ह्यातले, एक नडियादचा व एक मुर्शिदाबाद जिल्ह्यातला. त्या संपूर्ण गावात ही बातमी पसरली असेल की, या पोरांना लाच न देता नोकरी मिळाली म्हणून. अशा बातम्या संसर्गजन्य असतात.
 

गप्पांमध्ये ममता बंदोपाध्यायचा उल्लेख येणे स्वाभाविक होते. ममतांबद्दल ते चौघे खूप मोकळेपणाने बोलले. हे चौघेही तृणमूलचे समर्थक होते. म्हणजे मागील दोन निवडणुकीत त्यांनी तृणमूल कॉंग्रेसला मतदान केले होते. परंतु, यावेळी भाजपाला मतदान करण्याचा त्यांचा निश्चय होता. मी याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी ममता बंदोपाध्याय यांच्या कारभाराचे जे वर्णन केले, ते अंगावर शहारे आणणारे होते. आपण महाराष्ट्रात खूप सुखी आणि सुरक्षित आहे, असे वाटले. त्यापैकी दोन घटना सांगतो. ममतांनी कॉलेजात जाणार्या मुलींसाठीकन्याश्रीयोजना सुरू केली आहे. त्यात त्या मुलीला 25 हजार रुपये सरकारतर्फे देण्यात येतात. मुलीने महाविद्यालयात प्रवेश घेतला की, तिला 25 हजार रुपये मिळतात. लगेच तृणमूलचे गुंड (हा त्यांचा शब्द आहे) येतात आणि जबरदस्तीने ते 25 हजार रुपये खंडणी म्हणून घेऊन जातात. त्या गुंडांना विरोध करण्याचे आमच्या मनातही येऊ शकत नाही, असे ते म्हणाले. कारण त्यानंतर तुमचे काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे पैसा सरकारचा आणि तोकन्याश्रीयोजनेच्या माध्यमातून जातो तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडेमाझ्यापासून काही धोका नाही याची खात्री पटल्यावर त्या चौघांना ममतांच्या कृष्णकृत्यांबाबत किती सांगू नि किती नाही असे झाले होते. माझे लक्ष मात्र घड्याळाकडे होते.

 

मुसलमानांच्या धाकात तिथले हिंदू कसे जीवन जगत असतात, हे ऐकले तर रक्त तापल्याशिवाय राहात नाही. हे चौघेही खेडेगावातील होते. गोठ्यातील गुरेढोरे चोरीला जाणे, हे नित्याचेच आहे, असे ते म्हणाले. ही चोरी लपूनछपून होत नाही. दिवसाढवळ्या तुमच्यादेखत होते. मुसलमान येतात आणि तुमच्या गोठ्यातील गुरेढोरे सोडून घेऊन जातात. प्रतिकार केला तर जीवच गमवावा लागतो. त्यातील एकाने सांगितले की, गेल्या वर्षी मी माडीवर परीक्षेचा अभ्यास करीत होतो. मला खिडकीतून दिसले की, बाजूच्या घरातील गाई काही मुसलमान बळजबरीने सोडून नेत आहेत. मी हादरलो. कारण आमच्याकडे दररोज 15 लिटर दूध देणारी गाय होती. मी दुसर्याच दिवशी तिला 20 हजारात विकून टाकली. घरचे नाही म्हणत होते. अशाच एके दिवशी आपली गायदेखील ते चोरून नेतील, असे सांगून मी घरच्यांना चूप केले. आता लवकरच बकरी ईद आहे. त्या दिवशी तर गाय-चोरांचा कहरच असतो. मी हे सर्व असहायपणे ऐकून घेत होतो. माझ्या डोळ्यांसमोर मुसलमान गोतस्करांना मरेस्तोवर मारहाण करणारा जमाव आला. आम्ही महाराष्ट्रात इतके सुरक्षित आहोत की, जमाव असा हिंसेवर कसा काय उतरू शकतो, याचे आम्हालासेक्युलरी मध्यमवर्गीयआश्चर्य वाटत असते. माणसापेक्षा गाईचा जीव अधिक मोलाचा का, असे प्रश्न आम्ही तळमळीने मांडत असतो. पण ज्याने आपली गाय विकली, त्याच्या डोळ्यांत मला दिसले की, घरची दुभती गाय चोरून नेणारा जर याच्या तावडीत सापडला तर हा काही त्याला सोडणार नाही. त्या वेळी ज्यांच्या गाई आधी चोरीला गेल्यात तेदेखील याच्यासोबत येऊन त्या गोतस्काराला चांगलेच बुकलून काढतील. आपण काहीच करू शकत नाही, या असहायतेतून साचत गेलेली चीड मला त्या तरुणांच्या डोळ्यांत, बोलण्यात जाणवत होती.

 

नडियादच्या एकाने मग हळूच मला विचारले, 2019 साली नरेंद्र मोदीच सत्तेवर येणार ना? मी म्हणालो, तुम्हाला मोदीच का हवेत? तो म्हणाला, गृहमंत्री राजनाथिंसह यांनी बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाचा पहारा खूप कडक केला आहे. त्यामुळे आमच्या गाई चोरून त्या बांगलादेशात नेण्याचे प्रमाण खूप म्हणजे खूपच कमी झाले आहे. आम्हाला मोदीच हवा. मी म्हणालो, ते तुमच्यावर अवलंबून आहे. ते प्रश्नार्थक चेहर्याने म्हणाले, आमच्यावर कसे? मी म्हटले, बंगाल भाजपाला किती जागा देणार त्यावर सर्व काही अवलंबून आहे. चौघांचे एकमत होते की, अर्ध्या जागा भाजपाला मिळतील. मी म्हटले, असे असेल तर मोदी पुन्हा येणार हे निश्चित! त्यांनी अंदाज सांगितला होता आणि मीही अंदाजच सांगितला होता. पण, माझ्या उत्तराने त्यांच्या चेहर्यावर समाधान पसरले होते. अजूनही मला खूप विचारायचे होते आणि त्यांनाही खूप काही सांगायचे होते. पण, गाडी सुटण्याची वेळ झाली होती. मी निघालो. त्यांच्यापैकी मुर्शिदाबाद (70 टक्के मुस्लिम लोकसंख्या) जिल्ह्यातील जो होता तो दारापर्यंत सोडण्यास आला. तिथे हळूच मला म्हणाला, काहीही करा पण मोदीच आले पाहिजे. आमचे यावेळी मत भाजपालाच आहे. त्याच्या डोळ्यांतील संचित वेदना मला खूप अस्वस्थ करून गेली. भोगलेल्या वेदनेला महत्प्रयासाने मागे ढकलत माझ्याकडे मोठ्या आशेने बघत असलेले त्याचे ते डोळे मला आजही अस्वस्थ करीत असतात.

 

अपत्यांच्या वाढदिवसाला अमाप खर्च करणारे, आपल्या अपत्याची कुवत नसतानाही, लोकप्रतिष्ठेसाठी हजारो रुपयांची त्याला शिकवणी लावणारे, गरज नसताना हजारो रुपयांचे ब्रॅण्डेड कपडे घेणारे, पेट्रोल पाच रुपयांनी महाग झाले म्हणून मोदींच्या नावे खडे फोडतात. मध्यमवर्गीयांसाठी मोदीने काहीच केले नाही म्हणून त्याला 2019 साली चांगलाच धडा शिकवायचा, निर्णयही जाहीर करतात. त्या मुलांना भेटल्यापासून मला या उपरोक्त लोकांची कीव यायला लागलीय्‌. या देशातील कोट्यवधी लोक, नरकसदृश जीवन संपावे म्हणून मोदींवर आशा लावून बसले आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आले नाही, तर त्यांच्या नशिबी नरकच आहे आणि इकडे आम्ही मोदींना 2019 साली धडा शिकविण्याच्या गोष्टी करीत आहोत!

बंगाल बदलला आहे. तो तसा वरून दिसत नाही. ही मंडळी जाहीर बोलूही शकत नाहीत. कारण तृणमूलचे गुंड जिवाचे बरेवाईट करू शकतात. हे लोक भाजपाच्या सभेला जाणार नाहीत. घरात भाजपाचे प्रचारसाहित्यही ठेवणार नाहीत. नागपूरला प्रवासात ते मोकळे बोलले. कदाचित बंगालमध्ये गेल्यावरममता दिदी जिंदाबादचेच नारे लावतील. पण, त्यांच्या मनात वेगळे आहे. जे काही आहे ते भगवे आहे. आमच्याही मनात भगवे असले पाहिजे. काही काळासाठी हिरवा रंग दृष्टिआड झाला तर आभाळ कोसळणार नाही. पण, भगवा रंग दृष्टिआड झाला तर इतिहासच काय, भविष्यकाळही आपल्याला क्षमा करणार नाही, याची आम्ही खूणगाठ बांधली पाहिजे. बंगालमध्ये परिवर्तन होणार. त्यासाठी बंगाल, उर्वरित भारताकडे आशेने बघत आहे. आम्ही त्याची निराशा करता कामा नये.


@@AUTHORINFO_V1@@