अटलजींचा संघप्रवेश आणि प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018
Total Views |




 

 

 
स्व. अटल बिहारी वाजपेयी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकमेकांशी अटूत नाते होते. अटलजींचा संघप्रवेश आणि त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासावर या लेखाच्या माध्यामातून टाकलेला एक दृष्टिक्षेप...
 
 
 
मी संघाच्या संपर्कात आलो व दीर्घकाळ संघ संघटनेत राहिलो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला रा. स्व. संघ मनापासून भावला. मला संघ तत्त्वज्ञान तर आवडतेच, पण त्याहून अधिक अशी मला आवडणारी बाब म्हणजे, संघाची परस्परांच्या संदर्भातील व एकमेकांबद्दल जोपासली जाणारी धारणा,” हे शब्द आहेत अटल बिहारी वाजपेयी यांनी रा. स्व. संघाच्या संदर्भात लिहिलेल्या ‘आरएसएसइज माय सोल’ या विशेष लेखातील.सा. ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रकाशित या लेखामध्ये अटलजींनी संघाशी असणारे त्यांचे संबंध-संस्कार यावर विस्तृत व स्पष्ट शब्दांत विवेचन केले आहे.

 

 
स्वत: श्रद्धेय अटलजींच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्यांचा संघाशी सर्वप्रथम संपर्क आला तो १९३९ मध्ये. त्यावेळी अटलजी आर्य समाजांतर्गत बालसंघटन आर्य कुमार सभा, ग्वाल्हेरशी संबंधित होते. ग्वाल्हेरच्या आर्य कुमार सभेचे ते ग्वाल्हेर येथील प्रमुख कार्यकर्ते भूदेव शास्त्री यांनी एक दिवस आर्य समाजाच्या साप्ताहिक सत्संगाशिवाय संध्याकाळी रोजच्या शाखेत जाण्यास प्रोत्साहित केले व त्यातून अटलजी लहान असताना संघ शाखेत दाखल झाले. अटलजी ग्वाल्हेरला ज्या शाखेत जात असत, त्या शाखेतील बहुतांश बाल स्वयंसेवक मराठीत बोलत असत. मात्र, अटलजींना शाखेतील रोजचे खेळ व साप्ताहिक बौद्धिकवर्ग विशेष आवडत असत.

 

 
मात्र, संघदृष्ट्या बाल अटलजींवर प्रभाव पडला, तो संघ प्रचारक नारायणराव तरटे यांचा. नारायणरावजी त्यावेळी नागपूरहून ग्वाल्हेर येथे संघ प्रचारक म्हणून आले होते. अटलजींच्या मते, नारायणरांवाचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे पण प्रभावी होते. त्याशिवाय ते चिंतक-संघटकसुद्धा होते व यासारख्या वैशिष्ट्यांचा परिचय नारायणरावांच्या विचार-प्रचार संचाराद्वारे मोठ्या सहजगत्या व सर्वांना होत असे. त्यामुळेच, “आज मी जो काही आहे तो स्व. नारायणरावजींमुळेच,” असे अटलजी मोठ्या आदराने व विनम्रपणे नमूद करीत असतंसंघदृष्ट्या अटलजींवर ज्या अन्य दोन महनीय व्यक्तींचा प्रभाव पडला त्या म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. भाऊरावजी देवरस यांचा. संघदृष्ट्या त्यावेळी ग्वाल्हेर संभाग भाऊराव देवरसांचे कार्यक्षेत्र नव्हता. मात्र, एकदा एका कार्यक्रमासाठी तत्कालीन बौद्धिक प्रमुख स्व. बाबासाहेब आपे यांच्यासह भाऊराव देवरस ग्वाल्हेर येथे आले असता अटलजींचा व त्यांचा झालेला प्रथम परिचय प्रभावी ठरला.

 

 
शाळेत दहावीत असतानाच ‘हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय’ ही चिरस्मरणीय रचना लिहिणार्‍या अटलजींनी संघदृष्ट्या १९४१ मध्ये संघ शिक्षा वर्गाचे (त्यावेळचे अधिकारी शिक्षण वर्ग) प्रथम वर्ष १९४२ मध्ये द्वितीय वर्ष व १९४४ मध्ये बी.एच्या अंतिम वर्षाला असतानाच तृतीय वर्ष पूर्ण केले. त्यापूर्वी १९४० मध्ये त्यांना संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांना पाहण्याचे भाग्य लाभले होते. पदवीपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेर येथे पूर्ण केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी डी.ए. व्ही महाविद्यायल, कानपूर येथे प्रवेश घेतला. त्यानंतर १९४६ मध्ये त्यांनी संघप्रचारक म्हणून कार्य करण्यास सुरुवातकेली. त्यापूर्वी महाविद्यायलीन जीवनात शाखा स्तरावर काम करणार्‍या अटल बिहारींना १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलनाच्या काळात कारावासाची शिक्षा झाली होती.

 

 
अटलजींनी नमूद केल्यानुसार त्यांच्या वडिलांचा कधी संघाशी संबंध आला नव्हता. मात्र, त्यांचे वडीलबंधू शाखेत जात असत. अटलजींचे वडीलबंधू संघाच्या हिवाळी शिबिरात गेले असता, त्यांनी तत्कालीन रूढींनुसार शिबिरस्थानी स्वत:चे भोजन स्वत: बनवण्याचा आग्रह धरला. शिबिराच्या सर्व अधिकाऱ्यांनी पण त्यानुसार व्यवस्था करून दिली. मात्र, शिबिरकाळात अटलजींच्या वडीलबंधूंनी आपलेभोजन वेगळे बनविण्याचा आग्रह स्वयंप्रेरणेने सोडलाच, तसेच ते स्वेच्छेने इतर शिबिरार्थ्यांसह भोजन करू लागले. या सामाजिक संघ संस्काराचाही अटलजींवर मोठा व सकारात्मक परिणाम झाला. यातूनच अटलजींनी नमूद केले की, संघ केवळ व्यक्तिगत स्तरावरच नव्हे, तर सामूहिक व सामाजिक स्तरावर पण बदल घडवून आणतो. ही परिवर्तन क्षमता संघाची सर्वात मोठी खुबी आहे. व्यक्तिगत स्तरावर अनेकजण ‘निर्वाण साधना’ यांचे निर्वहन करतात. मात्र, सामाजिक संदर्भात असे होतेचअसे नाही. आता मात्र संघाचे व्यक्तीस्तरापासून सामाजिक स्तरापर्यंतचे परिवर्तन घडवून आणण्याचे सामाजिक साध्य साधले आहे. संघाचे हे सर्वात प्रमुख सामाजिक योगदान ठरले आहे.

 

 
समाज संघटनेच्या संदर्भात संघाच्या कामाचे वर्णन करताना संघाच्या माध्यमातून साधलेल्या संघटनेचे महत्त्व जाणून म. गांधींनी संघ स्वयंसेवकांनी आपले व्यवहार संस्कारांद्वारे अस्पृश्यतेचे संपूर्ण उच्चाटन केल्याबद्दल संघ आणि संघ संस्थापकांचे जे कौतुक केले होते, ते अटलजींच्या मते विशेष महत्त्वपूर्ण ठरले होते. कारण, त्यावेळी ‘अस्पृश्यता’ या विषयांवर वारंवार होणारी चर्चा व उल्लेख यामुळेच समाजातील घटकांमध्ये वेगळेपणाची भावना प्रचारित होत होतीअटलजींनी नमूद केल्यानुसार, संघासमोर दुहेरी स्वरूपाचे आव्हानपर काम आहे. एक म्हणजे हिंदूंचे संघटन करून सशक्त हिंदू समाजाचे निर्माण करणे व हे करण्यासाठी सर्व मतभेदांवर मात करणे. हिंदू समाजात काही मतभेद अवश्य आहे. उदाहरणार्थ, हिंदुस्थानमध्ये विविध प्रदेश भाषा प्रचलित आहेत व त्या विविधतेमध्येच आमच्या एकतेचे जे सूत्र अक्षुण्ण आहे, त्याची जपणूक संघाचे केली आहे. त्याचवेळी देशातील ख्रिस्ती मुसलमानांना राष्ट्र जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संघाला करायचे आहे.

 

 
त्यांना विश्वास होता की, हिंदू संघटन म्हणून संघाला हे सहजशक्य होणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, हिंदुस्थानमध्ये प्राचीन काळापासून प्रचलित पूजा पद्धती. या पद्धतींनुसार प्राणी, वृक्ष, नद्या, पर्वत इ.ची पूजा करण्याची प्रथा असल्याने इतर धर्मियांच्या धार्मिक श्रद्धांची जपणूक आम्हालासहजशक्य होणार आहे. मात्र, त्याचवेळी इतर धर्मियांना सल्लावजा शिकवणूक देताना अटलजींनी स्पष्ट केले होते की, त्यांनी पण भारताला आपली मातृभूमी मानले पाहिजे व त्यासाठी ‘दारुल हरब’ व ‘दारुल इस्लाम’ या मानसिकतेवर मात करणे तेवढेच आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर विशेषत: मुसलमानांना सल्ला देताना अटलजींनी स्पष्ट केले होते की, मुसलमान अल्पसंख्याक आहेत व त्यांना इतर लोकांचे संपूर्णपणे धर्मांतरण करून त्यांचे इस्लामीकरण करणे केवळ अशक्य आहे. याची जाणीव मुसलमानांनी ठेवणे गरजेचे आहे. कुराण यासंदर्भात मार्गदर्शन व दिशादर्शन करण्यास अपुरे आहे. कारण, त्यामध्ये काफिरांना जगण्याचे स्वातंत्र्य तर दूर; त्यांना स्थानसुद्धानाही. भारतीय मुसलमांनानी आपल्या या मानसिकतेमध्ये बदल घडविण्याची आवश्यकता आहे, यावर अटलजींनी भर दिला होता.

 

 
भारतील विभिन्न धर्मियांच्या संदर्भात विचार, कृती व आचार यासंदर्भात काँग्रेसने मुसलमानांशी संबंधित समस्या मुळातून समजून घेऊन त्याला अनुरूप कधीच धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत, असे स्पष्टपणे नमूद करताना वाजपेयींनी काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या नीतीवर ताशेरे ओढतानाच देशांतर्गत मुस्लिमांचा विचार करताना विविध विचारांची ज्याप्रकारे मांडणी केली होती ती व हा मुद्दा सदोदित चिंतनीय राहिलाअटलजींनी लिहिल्यानुसार, मुसलमानांसारख्या अल्पसंख्यांकांचा ‘तिरस्कार’ म्हणजेच द्वेष व घृणा, ‘पुरस्कार’ म्हणजे अल्पसंख्यांकांचा अनुनय व ‘परिश्कार’ म्हणजेच परिवर्तन या मार्गांचा अवलंब केला जाऊ शकतो. यामध्ये बदल, बदलाव, परिवर्तन यावरच अटलजींचा आग्रही भर होता. हे परिवर्तन देशभक्तीच्या संस्कारातून व्हावे, जेणेकरून भारतातील मुसलमानंमध्ये मशिद-मक्का याबद्दल श्रद्धा बाळगताना भारतभक्तीची जपणूक करणे, या व्यवहार्य राष्ट्रीय तोडग्यावर त्यांचा विशेष भर होता.

 

 
या पार्श्वभूमीवर आपल्या शालेय जीवनात लिहिलेल्या ‘हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू, मेरा परिचय’ या गाजलेल्या कवितेचाच संदर्भ देताना अटलजींनी पुढे नमूद केले होते की, ‘कोई पुछे काबूल मे जा कर कितनी मज्जिद तोडी’ या काव्यपंक्तींची आठवण करून देतानाच अटलजींनी आपल्या लेखात स्पष्ट केले होते की, “अयोध्येतील विवादास्पद बाबरी मशिदीचे बांधकाम पाडले जाणे, हे मुसलमान आणि मुस्लीम मतदारांच्या राजकीय अनुनयाला दिलेले सामाजिक प्रत्युत्तर होते.” हिंदूंच्या बदलत्या मानसिकतेच्या संदर्भात अटलजी म्हणतात, परंपरागतरित्या हिंदू समाज दास्यतेच्या मानसिकतेत वावरत होता. मात्र, आता संघाच्या माध्यमातून हिंदू आणि हिंदू समाज संघटित झाल्यामुळे मोठे राष्ट्रीय परिर्वतन झाले आहे. त्याचा राष्ट्रीय सामाजिक संदर्भांमध्ये लक्षणीय प्रभाव पडला आहे, असे सांगतानाच या वाढत्या प्रभावाचा परिघ वाढविण्यावरही त्यांचा भर असे.

 

 
आपल्या आणि संघाशी असणार्या प्रदीर्घ संबंधांची सुस्पष्ट शब्दात चर्चा करताना संघ स्वयंसेवकांचा परस्पर असणारा स्नेहपूर्ण संपर्क आणि व्यवहार याचा अटलजींनी जो उल्लेख केला, तो याप्रमाणे. त्यावेळी अटलजी लखनऊ येथे होते. लखनऊसह उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे आंदोलन विशेष जोरात होते. अचानक एक ज्येष्ठ समाजवादी पुढाऱ्याची तब्येत अचानक बिघडली, पण त्याची व तब्येतीची विचापूस करण्यास पक्ष सहकाऱ्यांपैकी कुणीच गेले नाही. ते पाहता, वयोवृद्ध समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव सहजगत्या उद्गारले की, “ही कसली समाजवाद्यांमधील बंधुता? रा. स्व. संघात असे कधीही होत नाही. एक स्वयंसेवक जरी शाखेत गेला नाही, तर त्याची विचापूस अनेकजण मोठ्या आत्मियतेने करतात.” यावर अटलजींची स्वाभाविक व टीकात्मक प्रतिक्रिया दिली. ती म्हणजे, मूलभूत रा. स्व. संघाचे काम मनुष्य निर्माण करणे हे असून, ही प्रक्रिया समाजाच्या सर्वच स्तरांवर न्यायची असून, राष्ट्र आणि समाजजीवनात अनेक बदल आणि बदलाव आले तरी संघ आणि संघटनेतील संस्कारमय मनुष्यनिर्माण प्रकिया अखंड सुरूच राहणार आहे व तेच संघाचे खरे काम आहे.”

 

 
अटलजींनी संघ स्वयंसेवक म्हणून आपल्या बाल्यावस्थेपासून जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपले स्वयंसेवकपण जपले. वेळोवेळी त्याचा प्रसंगनुरूप पुनरूच्चार केला. याला त्यांनी ध्येयनिष्ठतेची जोड दिली. मुद्दा हा स्वयंसेवक वा पंतप्रधान म्हणून काम करण्याचा असो किंवा प्रचारक वा पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचा असो अथवा राजकारण प्रशासनाचा असो, अटलजींनी आपले संघ संबंध कायम जपले. प्रसंगी कथित ‘दुहेरी निष्ठे’चा प्रश्न आला, त्यावेळीसुद्धा त्यांनी कर्तव्यनिष्ठेने संघनिष्ठा स्पष्ट केली व त्याची नव्याने व नव्या संदर्भासह आयुष्यभर जपणूक केली. हे त्यांचे वैशिष्ट्य सदा प्रेरणादायी ठरणारे आहे.
 
दत्तात्रेय आंबुलकर 

[email protected]

9822847886

संदर्भ- आरएसएस इज माय सोल : अटलबिहारी वाजपेयी

(‘ऑर्गनायझर’ २८ जानेवारी,- २०१८ विशेषांकातील पुनर्मुद्रित लेख)

@@AUTHORINFO_V1@@