माझे पितृतुल्य छत्र हरपले : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अटलजींच्या निधनावर देशभरातून दु:ख व्यक्त केले जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली आहे. 'अटलजींच्या जाण्याने माझ्या माथ्यावरील पितृतुल्य छत्र हरपले आहे' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. तसेच त्यांची कमतरता कोणीही भरून काढू शकणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

अटलजींनी नेहमी संकटांना सामोरे कसे जावे, याचे धडे सर्वाना दिले. देशहितासाठी कठीण निर्णय घेण्याची शिकवण देखील त्यांनी दिली. संघटन आणि शासन या दोन बाबींचे महत्त्व त्यांनी नेहमी सांगितले आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडून या बाबी त्यांनी रटून घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही सर्वजण एका पितृतुल्य व्यक्तिमत्वाला पोरके झालो असून त्यांची कमतरता कोणीही भरून काढू शकणार नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

अटलजींच्या मृत्यूची वार्ता मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपले आजचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यानंतर काल रात्रीच त्यांनी अटलजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या दर्शन घेतले तसेच पार्थिवावर पुष्पमाला अर्पण केली. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाहसह भाजपचे सर्व वरिष्ठ नेते देखील याठिकाणी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@