शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबियांचा असाही समजूतदारपणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 

 
कुटुंबियांकडून त्या प्रकरणावर पूर्णविराम
 
 

मुंबई दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावे एक खोटी ऑडिओ क्लीप सामाजिक माध्यमांवरून व्हायरल करण्यात आली होती. दरम्यान, राणे कुटुंबियांनी याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार केली होती. सदर प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचताच दहिसरमधील एका तरूणीने ही क्लीप तयार करून व्हायरल केल्याचे समोर आले. परंतु कोणत्याही स्वार्थी हेतूने ती क्लीप आपण तयार केली नसून सदर तरूणीने राणे कुटुंबियांची माफी मागितली. तसेच नुकतेच आपले लग्न ठरले असल्याचे तिने सांगताच राणे कुटुंबियांनीही त्या तरूणीचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी समजूतदारपणा दाखवत सदर प्रकरणावर पूर्णविराम लावला.

 
 

मेजर कौस्तुभ राणे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावे एक ऑडिओ क्लीप व्हायरल करण्यात आली होती. तसेच कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले होते. या क्लीपनंतर राणे कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर राणे कुटुंबियांनी समता नगर पोलीस स्थानकात या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात दहिसरमधील एका तरूणीने ही ऑडिओ क्लीप तयार केल्याचे समोर आले. दरम्यान दोन्हीकडील कुटुंबियांना पोलिसांनी पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगितले असता सदर तरूणीने ही क्लीप केवल देशभक्तीच्या हेतूने तयार केल्याची कबुली दिली. तसेच यामुळे राणे कुटुंबियांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दलही माफी मागितली. दरम्यान, आपले लग्न ठरले असल्याने सदर तरूणीने हे प्रकरण मिटवण्याची राणे कुटुंबियांकडे विनंती केली. राणे कटुंबियांनीही मोठ्या मनाने समजूतदारपणा दाखवत हे प्रकरण त्याच ठिकाणी मिटवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सदर तरूणीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@