महाकाव्य अनंतात विसावले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 

स्वातंत्र्योत्तर भारताच्या सुरुवातीच्या कालखंडात राष्ट्रवादाचं एक रोपटं देशाच्या राजकारणात रूजत होतं. मधल्या काळात अनेक वादळं आली, भूकंप झाले. परंतु, बीज अस्सल असलेलं हे रोपटं वाढतच राहिलं. आज ७२ वर्षांनंतर त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. रोपट्याचा वटवृक्ष होण्यात ज्यांचा सूर्याचा वाटा, ते अटल बिहारी वाजपेयी मात्र अनंतात विलीन झाले आहेत. या वटवृक्षाचं पान अन् पान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणेच निःशब्द झालं आहे.
 

युगान्त... अटलजी गेल्यावर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व वर्तुळांतून, सर्व स्तरांतून एका युगाचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे व्यक्त झाली. या वाजपेयी युगात त्यांच्या खांद्याला खांदा लावून अविरतपणे उभे असलेले, स्वतःदेखील एकपर्वअसलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी माझा गेल्या ६६ वर्षांपासूनचा मित्र गेल्याची भावना व्यक्त केली. अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांनी आपण एक वडीलधारं व्यक्तिमत्त्व हरपल्याचे सांगितले. अवघा देश शोकसागरात बुडाला. स्वातंत्र्योत्तर भारताच्या सुरुवातीच्या कालखंडात राष्ट्रवादाचं एक रोपटं देशाच्या राजकारणात रूजत होतं. मधल्या काळात अनेक वादळं आली, भूकंप झाले; परंतु बीज अस्सल असलेलं हे रोपटं वाढतच राहिलं. आज ७२ वर्षांनंतर त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. रोपट्याचा वटवृक्ष होण्यात ज्यांचा सूर्याचा वाटा, ते अटल बिहारी वाजपेयी मात्र अनंतात विलीन झाले... या वटवृक्षाचं पान अन् पान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणेच निःशब्द झालं आहे.

 

थक्क करणारा असा हा अद्भुत प्रवास... अटल बिहारी वाजपेयी. अजेय, अजातशत्रू, अढळ, अविचल, अटल.. गुरुवारी ते गेल्यापासून असंख्य प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अगदी कट्टर विरोधी पक्षांपासून सर्वांकडून. काहींनी वाजपेयींना सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हटलं, काहींनी त्यांचं कविमन अधोरेखित केलं, काहींनी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचे मनस्वी कौतुक केले, तर काहींनी त्यांनासंघाचा मुखवटावगैरेही म्हटलं. अटलजींना आदरांजली वाहताना त्यांच्याआडून नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा कृतघ्नपणाही काहींनी केलाच. प्रसंग काय, आपण बोलतो काय, याचं ना साधं भान, ना तारतम्य. काहींनी त्यांना राजकारणातील सूर्य म्हटलं. वास्तविक वाजपेयींचं मोठेपण यातून दिसून येतं. डोळ्यावर पट्टी बांधून हत्तीचं मूल्यमापन करणार्या चार-पाच माणसांचं एक चित्र प्रसिद्ध आहे. यामध्ये त्या चारजणांपैकी कुणी हत्तीची शेपूट पकडतो, कुणी सोंड पकडतो. आपल्या हाती लागलेल्या गोष्टीवरून प्रत्येकजण त्या हत्तीचा आकारउकार ठरवतो. वास्तविक, त्या हत्तीला हे लोक १० टक्केही ओळखू शकलेले नसतात. कारण, तो त्यांच्या दृष्टीमध्ये मावणारा असतो. अटलजी हे यामध्येच मोडणारं व्यक्तिमत्त्व... संयमी राजकारणी, ओघवता वक्ता, चाणाक्ष पत्रकार, संवेदनशील कवी, उत्तम संसदपटू, कुशल संघटक, एक तत्वज्ञ आणि लोकांचा आवडता पंतप्रधान... वाजपेयी यांचं हे एकेक अंग म्हणजे एक स्वतंत्र खंडच. या अनेक खंडांचं मिळून बनलेलंअटल बिहारी वाजपेयीनामक ९३ वर्षांच्या प्रवासाचं अद्भुत महाकाव्य.

 

मै मधु से अनभिज्ञ आज भी,

जीवनभर विषपान किया है।

किया नहीं विध्वंस विश्व का,

जीवन भर निर्माण किया है।

 

संघात म्हटल्या जाणार्या या काव्यपंक्ती अटलजींच्या जीवनाचं सार सांगतात. ते रोपटं वटवृक्ष झालं, कारण त्याचं बीज अस्सल होतं. ते बीज काय होतं, याचं उत्तर या ओळींमध्ये आहे. म्हणूनच तररग रग हिंदू मेरा परिचयया अटलजींच्या गाजलेल्या कवितेत ते म्हणतात, “भूभाग नहीं, शत शत मानव हृदय जितने का निश्चय!” शत शत मानव हृदय जिंकूनच अटलजी गेले. ते ज्या विचारधारेचं, ज्या भावविश्वाचं प्रतिनिधित्व करत होते, ती विचारधाराहिंदुत्ववादीम्हटली जाते. ही विचारधारा जपणार्या, पुढे नेणार्या हजारो, लाखो कार्यकर्त्यांच्या भावविश्वात डोकावून पाहिल्यावर हे हिंदुत्व काय हे ते नेमकं समजतं. ‘राष्ट्रवादआणिहिंदुत्वया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अटलजींनी ठासून सांगितलं. राष्ट्रवाद म्हणजे केवळ भूभाग मिळवणं, वाढवणं नव्हे, तर त्या भूभागावर वसणार्या समाजाचं सर्वांगीण उत्थान हा राष्ट्रवाद आणि तेच हिंदुत्व. ते विध्वंसक नाही, तर आश्वासक. मानवकल्याणाचं स्वप्न पाहणारं आणि त्यासाठी अविरत झटणारं. ‘वसुधैव कुटुंबकम्म्हणणारं, ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयःम्हणणारं... मात्र, याचसोबत ते दुर्बळ, असाहाय्य नाही, तर सर्वसामर्थ्यसंपन्न, स्वत्वाभिमानी आहे. गेली जवळपास ९० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच मुशीतून निर्माण झालेला परिवार हाच विचार घेऊन पुढे जात आहे.

 

याच विचाराला राजकीय पटलावर आकार दिला तो जनसंघाच्या निर्मितीने... पुढे तो भारतीय जनता पक्ष झाला, परंतुराष्ट्रवादहा शब्द उच्चारणंदेखील ज्या काळी पाप मानलं जाई, असा तो काळ होता. हिंदू आणि हिंदुत्वाशी संबंधित जे काही असेल, ते त्याज्य ठरवलं जाण्याचा तो काळ होता. इथे तर हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हेच जीवन मानणारी समर्पित अशी जिवंत, हाडामासाची माणसं होती. ती साहजिकच अस्पृश्य ठरली. असंख्य मानापमान, हालअपेष्टा त्यांच्या वाट्याला आल्या. हेटाळणी, थट्टा-मस्करी झाली. हे सर्व सहन करत, ही मंडळी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हापुन्हा झेप घेत राहिली. डगमगता अविचलपणे उभी राहिली. २०१४ हे या वाटचालीतील आजवरचं अत्युच्च शिखर. पण, त्या ऐतिहासिक यशाचा पाया रचला अटलजींनी. म्हणूनच अटल-अडवाणींचीती ६६ वर्षंआजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला एक हळवा कोपरा आहे. कारण, ती केवळ मैत्रीची वर्षं नव्हती, तर तपस्येची वर्षं होती. २०१४ मध्ये भाजपचे खासदार स्पष्ट बहुमतात निवडून आल्यानंतर संसदेत जेव्हा पहिली बैठक झाली, तेव्हा नरेंद्र मोदींनीहा आजचा क्षण आपल्या कार्यकर्त्यांनी पिढ्यान्पिढ्या उपसलेले कष्ट, केलेला त्याग यामुळेच आपल्याला पाहायला मिळत आहे,” अशी भावूक प्रतिक्रिया दिली होती. अडवाणींनी मोदींना मिठी मारली, तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले होते. परंतु, हा ऐतिहासिक क्षण पाहायला अटलजी मात्र तिथे उपस्थित नव्हते. त्यानंतर देशात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात भाजपने सुरू केलेली घोडदौडदेखील कदाचित अटलजींना ज्ञात नसावी आणि काल तर अटलजींनी या विश्वाचाच निरोप घेतला.

 

शब्दांच्या भिंतीवरती गोंदुनी धुक्याचे वेल,

तो मिटुनी नेत्र म्हणाला, नक्षत्रफूल उमलेल

अवचित त्या वेलावरूनी तो धुक्यांत गेला थेट,

घमघमते ठेवूनि मागे, नक्षत्रफुलांचे बेट..

 

प्रसिद्ध मराठी कवी ग्रेस यांच्या या ओळी भारतीय जनता पक्षाच्या या वाटचालीत अटलजींना चपखल लागू होतात. अटलजी गेले. पुन्हा पुन्हा लिहूनही या वाक्यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु खरोखरच अटलजी गेले. एक महाकाव्य अनंतात विलीन झालं. हजारो, लाखो निःशब्द मनांत आज भावनांचा कल्लोळ दाटलेला आहेच. परंतु, अटलजींना खरीखुरी श्रद्धांजली अर्पण करायचीच असेल, तर या दुःखातून सावरून पुढे जावंच लागेल. ‘आओ फिरसे दिया जलाएंया कवितेत त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणेआनेवाला कललक्षात घेऊन, त्याच अटल, अविचलतेने पुढे वाटचाल करणे, हीच या राष्ट्रऋषीस खरी श्रद्धांजली ठरेल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@