मध्य रेल्वेचे ऊर्जाबचतीकडे पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |



एलईडी बल्बच्या सहाय्याने वाचवले १३ कोटी


मुंबई मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीकडे पाऊल टाकत तब्बल १३ कोटी १० लाख रूपयांची बचत केली आहे. मध्य रेल्वेने आपल्या कार्यालयांमध्ये एलईडी बल्बचा वापर करत १४२.३६ युनिट्स वाचवत मोठी बचत केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सदर माहिती दिली.

 

मध्य रेल्वेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६१.३६ दशलक्ष टन मालवाहतुक केली असून रेल्वेचे भंगार हटवून २५२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर रेल्वेच्या ४३२ स्थानकांमध्ये तसेच सेवा इमारती, रुग्णालये, प्रशासकीय इमारती, दुरुस्ती डेपोत पारंपारिक दिव्यांऐवजी एलईडी दिवे बसवून १३.१० कोटींची बचत केल्याचे शर्मा म्हणाले. तर यादरम्यान ६१ मानवरहित फाटके बंद करण्यात आली असून यावर्षी ७ आणखी फाटके बंद करण्यात येणार आहेत. तर २०१७-१८ मध्य रेल्वेवर २५ पादचारी पूल कार्यरत झाले असून अन्य ४ पादचारी पूल लवकरच कार्यरत होणआर असल्याचे ते म्हणाले. ठाकुर्लीतील उड्डाण पूल सुरब झाल्याने उपनगरीय लोकल सेवेच्या वेळापत्रकात त्यामुळे सुधारणा होईल. बेलापूर -सीवूड -उरण प्रकल्पाचा भाग म्हणून बेलापूर आणि नेरूळ येथे नवीन आरआरआय यंत्रणेसह यार्ड रिमॉडेलिंग करण्यात आले असल्याचेही शर्मा म्हणाले.

 

ड्रायव्हर केबिन वातानुकुलित

मध्य रेल्वेवर २१ बम्बार्डिअर लोकल सुरू करण्यात आल्या असून यातील १२ गाड्यांमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. तसेच ड्रायव्हर केबिनही वातानुकुलित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@