आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नाशिकचे अशोक दुधारे निरिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 

 

नाशिक: दिनांक १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जकार्ता - इंडोनिशिया येथे आयोजित १८व्या आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या तालवारबाजीच्या महिला संघाला स्थान मिळाले आहे. या संघाचे प्रतिनिधीत्व कबीता देवी (आसाम ), ज्योतीका दत्ता (हिमाचल प्रदेश), इना अरोरा आणि जसप्रीत कौर (पंजाब ) या चार खेळाडू करणार आहेत. तसेच संघाचे मार्गदर्शक म्हणून मोहित अश्विनी (पंजाब ) चरणजीत कौर (चंदीगड ) तर व्यवस्थापक म्हणून औरंगाबादचे डॉ, उदय डोंगरे यांचीही निवड करण्यात आली आहे. तर या स्पर्धासाठी निरीक्षक म्हणून नाशिकचे क्रीडा संघटक अशोक दुधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या १८व्या आशियायी स्पर्धेसाठी भारताचा संघ जकार्ता येथे रवना झाला. भारताच्या तलवारबाजी संघाला केंद्रीय क्रीडा मंत्री तथा स्वतः ऑलीम्पिक पदकविजेते असलेले राजवर्धनसिंग राठोड आणि भारतीय ऑलीम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहेता यांनी शुभेच्छा दिल्या.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@