आता उरल्या त्या फक्त आठवणी....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आज अनंतात विलीन झाले. आता ते आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या आठवणी सगळ्यांच्या मनात नेहमीच कायम राहतील. देशातील सगळ्या राजकीय, सामाजिक, सिनेसृष्टीतील दिग्गज लोकांच्या मनात तसेच ज्या सामान्य नागरिकांचा त्यांच्याशी संबंध आला त्यांच्या मनात आता फक्त ‘अटलजी’ यांच्या आठवणीच कायम राहणार आहेत. 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच एका आठवणीला उजाळा देणारे ट्वीट सोशल मिडियावर शेअर केले आहे. ‘मेरे अटल जी’ असे म्हणणारे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी हे अटल बिहारी वाजपेयी यांना पिता समान मानत होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने मी पोरका झालो अशा भावना नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. अभिनेता शाहरुख खान याने देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 
 
 
 
 
 
गानसम्राज्ञीलता मंगेशकर यांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आता सगळ्या क्षेत्रातून जे जे लोक अटल बिहारी वाजपेयी यांच्या संपर्कात आले त्यांनी सगळ्यांनी आपआपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न अनेक माध्यमांतून केला आहे. अटल बिहारी वाजपेयी हे आपल्यात नसले तरी देखील ते आपल्या आठवणींमधून आपल्या सोबत नेहमीच असतील असे मत सगळे व्यक्त करत आहेत. 
 
 
 
अभिनेता ह्रितिक रोषन याने देखील त्यांच्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या  आठवणींना उजाळा दिला आहे. ह्रितिकचे वडील अभिनेता राकेश रोशन आणि ह्रितिक यांची भेट जेव्हा बिहारी वाजपेयी यांच्यासोबत झाली तेव्हाचे छायाचित्र ह्रितिकने सोशल मिडियावर शेअर केले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@