40 लाखांचा विनापरवाना लाकूडसाठा जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |



वाडा: वनविभागातील पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल एच.व्ही सापळे त्यांच्या इतर सहकाऱ्यानी वाड्यातील एका दास्तान डेपोवर धाड टाकली. या धाडीत या डेपोमध्ये विनापरवाना लपवून ठेवलेला जवळपास ५० ते ६० ट्रक साग, खैर इतर इंजाली असा १०१२ घनमीटर लाकडांचा माल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या संपूर्ण लाकडांची किंमत ४० लाखांहून अधिक असल्याचे वनअधिकाऱ्या कडून सांगण्यात येत आहे. वाडा-मनोर या राज्य महामार्गालगत ठाणगे पाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोत विनापरवाना लाकडाचा मोठा साठा असल्याची माहिती वाडा पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल सापळे यांना महिन्याभरापूर्वीच मिळाली होती. त्यांनी या दास्तान डेपोला दि. २० जुलै २०१८ रोजी सील केले पुढील तपास सुरू केला. या तपासात या दास्तान डेपोवर या डेपोपासूनच अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमान गावातील काही शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीतील साग, खैर इतर इंजाली झाडे विनापरवाना तोडून त्याचा साठा ठाणगेपाडा येथील सुनील आंबवणे यांच्या मालकीच्या दास्तान डेपोवर ठेवण्यात आला होता. या दास्तान डेपोवर वन अधिकर्याना धाड टाकून साग २८७ : ४३४ घनमीटर, खैर ७५ : ७२१ घनमीटर इतर इंजाली ६४९ :६१२ घनमीटर असा एकूण १०१२ घनमीटर विनापरवाना माल जप्त केला.

 

या प्रकरणी या दास्तान डेपोचे मालक सुनील आंबवणे रा. वाडा, राजू शिलोत्री रा. पोशेरी रमेश पाटील रा. पालसई या तिघांवर वन नियमावली २०१४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील तिन्ही आरोपींची वाडा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली असून पुढील तपास वाडा पोलीस वाडा पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल एच.व्ही. सापळे करीत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@