जळगावच्या औद्योगिक नगरीसाठी ना . महाजनांचे प्रयत्न उद्योगपती रतन टाटांसोबत सविस्तर चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |

 
 
 

जळगावच्या औद्योगिक नगरीसाठी ना . महाजनांचे प्रयत्न
 उद्योगपती रतन टाटांसोबत  सविस्तर चर्चा
 

जळगाव , १६ ऑगस्ट 
राज्याचे आरोग्यदूत म्हणून ओळखल्या जाणारे वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची गुरूवारी प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत मुंबई येथे बैठक झाली. ना.गिरीश महाजन व जी.एम.फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात सुरू असलेल्या आरोग्य अभियानाची माहिती व कार्य रतन टाटांनी जाणून घेतले. यावेळी जळगाव जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासंबंधी ना.महाजनांनी टाटांना साकडे घातले. 
 
जलसंपदा तथा वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन व उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबई येथे भेट 
 ना.महाजन यांच्यातर्फे गेल्या अनेक वर्षापासून राज्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून राज्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडविण्यात आल्या . आरोग्य शिबिरात कर्करोगाचे निदान झाल्याने आजवर अनेकांचे प्राण वाचले आहे. ना.महाजन यांच्या कार्याची सविस्तर माहिती रतन टाटा यांनी जाणून घेतली.  भविष्यात टाटा समुहाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करता येईल यावर त्यांनी चर्चा केली.
जिल्ह्यातील उद्योगासाठी साकडे
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रसंगी जळगाव ,एम.आय  .डी . सी . मध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले होते आश्वासन
 जळगाव आणि जामनेर येथील भौगोलिक, दळणवळण आणि उपलब्ध साधनसामुग्रीची माहिती ना.गिरीश महाजन यांनी रतन टाटांना दिली. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होणे आवश्यक असल्याचे सांगत जिल्ह्यात काही नवीन उद्योग सुरू करण्यासाठी  टाटांना साकडे घातले.
ना.गिरीश महाजनांनी घेतलेला आरोग्यसेवेचा वसा
ना.गिरीश महाजन यांनी राज्यात जनआरोग्य चळवळ सुरू केली आहे. 2004 ते 2018 पर्यंत जळगाव, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार येथे स्थायी आरोग्य केंद्र सुरू. 144 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा. सीएसआर फंडातून 16 अत्याधुनिक रूग्णवाहिकांचे लोकार्पण. रूग्णावर संपूर्ण उपचार होईपर्यंत नातेवाईकांना नाश्ता, भोजन व निवासाची व्यवस्था. 2 लाखावर रूग्णांवर उपचार. विविध संस्थांकडून 21 कोटी 50 लाख 85 हजारांचा निधी उभारला. शिबीरांसाठी नियोजनबध्द तयारी. शिबीरपूर्व रूग्ण तपासणी. शिबीरातून आजवर 12 हजार गावे, 19 शहरे, 45 हजार स्वयंसेवक, 7 हजार अधिकारी व कर्मचारी स्वयंसेवक जोडले. हजारो विशेष तज्ज्ञ, डॉक्टर्स, आरोग्य केंद्र, रूग्णालय, शासकीय, अशासकीय महाविद्यालयाचा सहभाग. शिबीरातील 78 हजार 690 रूग्णांवर शस्त्रक्रीया. भविष्यात मुंबई येथे निरामय सेवा फाऊंडेशनला रूग्णांसाठी स्वमालकीची सुसज्ज इमारत उभारणे. महाअवयवदान अभियानाला गती देणे. दिव्यांग सहायभूत योजनेची व्याप्ती वाढविणे. स्तन कर्करोग जनजागृती अभियान, लठ्ठपणा जनजागृती अभियान, कुपोषण सर्वेक्षण व निर्मुलन अभियान, स्वच्छ मुख अभियान, मधुमेह मुक्त महाराष्ट्र अभियान, मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान चळवळ अशीच सुरू ठेवण्याचा वसा घेतला असल्याची ग्वाही मंत्री ना.गिरीश महाजन यांनी उद्योगपती रतन टाटा यांना दिली.
Attachments area
@@AUTHORINFO_V1@@