श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात
 
जळगाव, 16 ऑगस्ट
देशाचा 72 वा स्वातंत्रदिन विविध उपक्रमांनी समर्पण संस्था संचालित श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात विविध संस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शेखर देवभानकर, संस्थेचे अध्यक्ष सदाशिव महाजन, सचिव संजय भावसार, कार्यकारी संचालक राजेंद्र नन्नवरे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका अर्चना उजागरे व समन्वयक माधुरी पाटील उपस्थित होते. मान्यवर, विद्यार्थी व शिक्षकांनी तिरंगी ध्वजास वंदन केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोर या चार गटांनी  संस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गायन आणि नृत्य सादर केले. कृष्णमेघ नन्नवरे या विद्यार्थ्यांने  हृदयद्रावक  कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी डंब्लेल्स व मानवी पिरॅमिडचे अप्रतिम प्रात्याक्षिक केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना अभ्यास करतांना विषय निवडीचे स्वतंत्र्य विषयी मार्गदर्शन केले. शिक्षीका ग्रेस डॅनियल व संगीता यांनी भाषणे दिली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्याने भारत मातेला स्मरुन विद्यार्थी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचा-यांनी पर्यावरण रक्षणाची आणि स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मृणाल कोल्हे व वसाक्षी साळी या विद्यार्थीनींने तर आभार मानसी भोई यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@