जननायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |


 


भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांनी ६१ वर्षांपूर्वी राष्ट्रकार्याचे स्वप्न पाहिले होते. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राम नाईक यांनी या लेखातून वाजपेयी यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे केलेले वर्णन...

 

भारतरत्नअटलबिहारी वाजपेयी! अमर्याद कर्तृत्वाचे धनी असलेला जननायक. अटलजींचे वर्णन करायला अनेकानेक गुणविशेष सांगावे लागतात; पण त्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख होतो तो संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या अमोघ वाणीचा! मा. अटलजींकडे तब्बल ६१ वर्षांपूर्वी युवावस्थेतला मी स्वत: आकृष्ट झालो, तेही त्यांच्या वाणीमुळेच.१९५३ मध्ये पुण्याच्या संघशिक्षा वर्गात तरुण अटलजींच्या मुखातून ऐकलेल्या देशभक्तीपर काव्यपंक्तींनी अशी जादू केली की, अटलजींनी कवितेतून दाखविलेल्या राष्ट्रकार्याचे स्वप्न माझ्या मनात पक्के रुजले.

 

परमपूज्य गोळवलकर गुरुजींच्या निकट सानिध्यामुळे संघप्रचारक म्हणून समाजसेवेचा वसा घेतलेले अटलजी तेव्हा मी सर्वप्रथम पाहिले, माझं महद् भाग्य की, आज ६१ वर्षांनंतर मी स्वतःला अभिमानाने त्यांचा निकट सहकारी म्हणू शकतो. अटलजींच्या वाणीची जादूच अशी की, समोरचे मंत्रमुग्ध व्हावेत, विरोधकही त्यांच्या या गुणाचे प्रशंसक होते. त्यांच्या बोलण्यातला सच्चेपणा थेट हृदयाला जाऊन भिडणारा होता. मला आठवतंय मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेचे प्रमुख वक्ता श्री. अटल बिहारी वाजपेयी असतील, तर अमाप गर्दी हे नेहमीचेच. १९८४ मध्येही आम्ही अशाच एका सभेचं आयोजन केलं होतं. तुडुंब भरलेल्या त्या मैदानावर अटलजी बोलायला उभे राहिल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. काही मिनिटं सतत सुरू राहिलेला तो उत्स्फूर्त नादध्वनी हवेत विरत असतानाचे अटलजी म्हणाले, “हारा हुआ अटल कैसा दिखता है यह देखने के लिए जनसागर उमडा पडा है।आणि सभा स्तब्ध झाली. १९८४ मध्ये श्रीमती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला होता. संपूर्ण भारतातून भाजपाचे फक् दोनच खासदार निवडून आले होते आणि त्या दोघांत अटलजी स्वत: नव्हते. स्वत:चा आणि पक्षाचा पराभव पचवून लक्षावधी नागरिकांसमोर त्याची कबुली देत, पुन्हा उभे राहणारे श्री. अटलजी निवडणूक, सत्ता यांच्या सीमा पार करून भारताचे जननायकबनले. प्रसंगी पराभव पचवून पुन्हा जनसेवेला कसे सज्ज व्हायचं, याचा धडाच त्यांनी आम्हांला त्या वेळी दिला.

 

भाषेचा सहज उपयोग करून समोरच्याला आयुष्यभरासाठी जिंकण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे होते. मी स्वतःही ते अनुभवलंय. १९९४ मध्ये मी कर्करोगाने आजारी होतो. अवचित एकेदिवशी सकाळी अटलजींच्या दिल्ली कार्यालयातून श्री. शिवकुमारांचा फोन आला. तासाभरात अटलजी पोहोचलेही. माझ्या तीन खोल्यांच्या घरात अटलजी मोकळेपणाने वावरले. दररोज दोन-तीन व्यक्तींपेक्षा अधिक जणांना भेटायला डॉक्टरांची अनुमती नव्हती. प्रेमाने विचारपूस करायला येणाऱ्या ना हे सांगून दिलगिरी व्यक् करण्यासाठी घरात लावलेला फलक, अभ्यागतांसाठी ठेवलेली नोंदवही याचेही त्यांनी आस्थेने वाचन केलं. माझ्या आजारपणामुळे, तसेच त्यांच्या अचानक येण्यामुळे अटलजींचे यथायोग्य स्वागत झालं नाही, अशी रुखरुख पत्नीला वाटत होती; पण पुढे बरा झाल्यावर पुन्हा कामाला लागण्यापूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमाला आलेल्या अटलजींनी भर सभेत सांगितलं, “घरं सगळ्यांची असतात; पण त्याला घरपण असतं का? रामभाऊंचं छोटंस घर; पण सगळं टाप-टीप. घरातल्या माणसांमुळे घराला येणाऱ्या घरपणाचा आदर्श नमुना! लोकं पाहायला येणार, त्यांना भेटता आलं नाही याचं वाईट वाटू नये, निदान रामभाऊंना बघता यावं, यासाठी बेडरूमला काचेचं दार लावून पाहुण्यांचं मन जपणारं ते घर आहे!” आजही आमचे डोळे त्या भाषणाच्या आठवणीने पाणावतात. याच सभेत मोठ्या मनाने आपल्या सहकाऱ्या चे कौतुक कसे करावे, त्याला प्रेरणा कशी द्यावी हे त्यांनी दाखवून दिले. या सभेची गर्दी राम नाईकांसाठी आहे असं सांगत, अटलजी म्हणाले, “कभी-कभी ईर्ष्या होती है, जब किसी सहयोगी को लोगों का इतना अपनत्व मिलता है, इतना सहयोग मिलता है, इतना आशीर्वाद मिलता है।

 

अटलजींच्या वक्तृत्वात देश काय, सारे जग आकर्षित करायचे सामर्थ्य होतेच; पण ते जननायक बनले, त्यांनी देशापुढे जाज्वल्य; परंतु त्यागी नेतृत्वाचा जो आदर्श निर्माण केला, देशाला जागतिक पातळीवर मानमरातब मिळवून दिला त्यामुळे! सुरुवातीला आग ओकणारा नेता’ (प्रख्यात पत्रकार श्री. रुसी करंजी यांच्या भाषेत ‘Fire Eater’) अशी ख्याती मिळविणाऱ्या अटलजींनी आणीबाणीनंतरच्या 18 महिन्यांच्या आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मात्र कणखरपणा कायम ठेवत असतानाच, परराष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले. प्रखर देशाभिमानी असलेल्या या नेत्याने जागतिक व्यासपीठावरही मानाचे स्थान मिळविले. अटलजींच्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या छोट्या कारकिर्दीचीही जगाने कौतुकाने नोंद घेतली होती हे जाणून तर श्री. नरसिंहराव यांनी ते पंतप्रधान असताना युनोमध्ये शांततेबाबत भारताची भूमिका मांडण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचे नेते असलेल्या अटलजींवर सोपविली. विरोधकांनीही अटलजींचे नेतृत्व मान्य केलं आहे, याचा हा खणखणीत पुरावा होता. देशात विरोधात असले, तरी देशाबाहेर मात्र हा माणूस तो विरोध बाजूला ठेवून देशहिताची काळजी घेईल, याची विरोधकांनाही खात्री! अटलजींनीही त्या वेळी आमची भूमिका पांडवांप्रमाणेच वयं पंचाधिकम् शतम्’ (आम्ही 105 आहोत) अशी आहे”, असं वक्तव्य केलं होते. इंग्लिशवरही प्रभुत्व असलेल्या अटलजींनी युनो मात्र हिंदीत भाषण केल्यामुळे भारताची मान आणखी उंचावली होती. ‘युनो भारतीय भाषेत झालेल्या त्या पहिल्या भाषणाने जगाला भारतीयांची अस्मिताजपणे आवश्यक आहे हे कळून चुकले.

 

अटलजींनी आपल्या अस्मितेचा, त्यागी वृत्तीचा आणि नेतृत्वाचा सर्वात मोठा परिचय दिला १९९८ मध्ये. वाटेल ते करून सत्ता नको, याबाबत ते ठाम होते. सत्तेसाठी मतं खरेदी केली जातात हे आता उघड गुपित आहे. अटलजींनी मात्र अवघं एक मत कमी आहे म्हणून तेव्हा पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. सत्ता टिकावी म्हणून वाटेल ते करणार नाही हे त्यांनी जगाला कृतीतून दाखवून दिलं. आज मागे वळून पाहताना वाटतं, त्या निर्णयात आणखी एक गोष्ट दडली होती, ती म्हणजे त्यांचा आणि सामान्य जनतेचा परस्परांवर असलेला विश्वास. आज राजीनामा दिला असला, तरी सत्य जाणणारी जनता उद्या पुन्हा कौल देईल, याची अटलजींना जणू मनोमन खात्रीच होती, तसेच घडलेही. पुन्हा अटलजीच पंतप्रधान झाले. एवढेच नव्हे, तर संयुक् सरकार स्थापन करून सफलतेने देशाचा कारभार करता येतो हेही त्यांनी दाखवून दिले. मे-२००४ पर्यंत सलग सहा वर्षे देशाचे नेतृत्व करीत असताना अटलजींच्यातला जननायक उभ्या विश्वाने पाहिला. भारताच्या विकासाचे ध्येय उरी असलेल्या अटलजींनी विकासाद्वारे देश जोडण्याचे ठरविले. ‘प्रधानमंत्री सडक योजनाहा त्याचा सर्वात सफल मार्ग ठरला. ग्राम सडक योजनेद्वारेही छोटी-छोटी गावे शहरांशी जोडली. वेगवेगळी राज्ये महामार्गांनी जोडण्याचा भव्य प्रकल्प राबविला. याहीपुढे जाऊन देशातील सर्व नद्या जोडण्याची योजना हाती घेण्यासाठी आवश्यक मनोभूमिका अटलजींनी तयार केली. दुर्दैवाने या योजनेचा प्रारंभ करण्याआधीच सरकार बदलले गेले.

 
 
 
 

अटलजींनी विकासाच्या मार्गांवर देश गतीने नेलाच; परंतु देशाच्या इतिहासात अटलजींचे नाव सुवर्णाक्षरात नोंदले जाणार आहे ते कारगील युद्धाच्या यशाबद्दल! एक नेता म्हणून आपल्या सहकाऱ्या नाही ते कशी सहज प्रेरणा देतात, याचा कारगीलसंदर्भात मी स्वतः: अनुभव घेतला आहे. युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी आपण काहीतरी कायमस्वरूपी तजवीज केली पाहिजे, या त्यांच्या विचारातूनच मी पेट्रोलियममंत्री म्हणून पुढाकार घेऊन शहिदांच्या वीरपत्नींना, वीरमातांना नजीकच्या कुटुंबीयाला पेट्रोल पंप अथवा गॅस एजन्सी दिल्या. अटलजी देशप्रेम, शहीद या विषयांबाबत एकाच वेळी हळवे कणखर झाले आहेत. कित्येक दशक दीव-दमण, दादरा-नगर-हवेली येथील स्वातंत्र्यसंग्रामांतील सहभागी झालेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्यता दिली गेली नव्हती, हेही काम अटलजींनीच केले.

 

हाती असलेली सत्ता ही जनहितासाठी राबवायची हे अटलजींचे धोरण होते. म्हणूनच प्रत्येक सहकाऱ्या च्या चांगल्या कल्पना, योजना त्यांनी स्वीकारल्या! त्यातूनच त्यांनी मुंबईकर उपनगरी रेल्वेप्रवाशांसाठी स्वतंत्र मुंबई रेल्वेविकास प्राधिकरण स्थापनेसाठी मला प्रोत्साहन दिले. सामान्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी खासदारनिधी वाढविण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखविला. सहकाऱ्या वर विश्वास ठेवून धाडसी निर्णय घेणारा नेता मी अटलजींमध्ये पाहिला, तो सुदानशी तेल उत्पन्नाबाबत मैत्रीकरार करताना! सुदानसारख्या देशावर विश्वास ठेवून हजारो कोटी रुपयांचा करार करावा की, काय याबाबत मंत्रिमंडळात अनेकांना प्रश्न पडला होता. त्यांच्या भीतीला आधारही होता; पण हा करार यशस्वी होऊ शकतो त्यामुळे देशाला करोडोंचा नफा होईल हे मी दाखवून दिल्यावर अटलजींनी तत्काळ त्यांची अनुकूलता व्यक् केली. अर्थात, देशहितासाठी धाडसी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. म्हणूनच तर ते पंतप्रधान असताना अणुचाचणी होऊ शकली. आता अणुकरारावरून रान माजविणाऱ्या ना सोईस्कररित्या अटलजी नसते, तर अणुचाचणी होऊच शकली नसती, याचा विसर पडतो हे आपले दुर्दैव. मात्र, बाहेरच्या देशांमध्ये अशा विविध विषयांमुळे अटलजींबद्दल सार्वत्रिक आदर भावना आहे.

 

जगाचे लक्ष वेधावे, असे देशाचे नेतृत्व करणे सोपे नसते. अटलजी पंतप्रधान होते तेव्हा तर हे कर्मकठीण होते. २३ पक्षांचे संयुक् सरकार यशस्वीपणे चालवायचे, हेच शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. देशातच नव्हे, तर जगाच्या लोकशाहीत यापूर्वी असे घडले नव्हते. वेगवेगळ्या २३ राजकीय पक्षांना एकत्र घेऊन देश पुढे नेताना आलेल्या अगणित अडचणींबद्दल एक अवाक्षर काढता अटलजींनी देश पुढे नेला.  निवडणुकीचे राजकारण मोठे विचित्र असते. देशाला प्रगतिपथाकडे नेणाऱ्या अटलजींना पुन्हा एकदा सरकार बनवायची संधी वर्ष २००४मध्ये जनतेने नाकारली. त्याही परिस्थितीत अटलजी स्वतः: निवडून आले होते. त्यांची जनमानसावरची पकड तशीच भक्कम होती. पराभव झाला, तरी तेच त्या वेळी देशातील सर्वात मोठे नेते होते. पराभवाने सहकारी खचू नयेत, नव्या जोमोने काम सुरू राहावे, यासाठी अटलजींनी कंबर कसली. आपण निर्माण केलेली संघटना पराभव पचवून शानदारपणे काम करते आहे, या समाधानात भारतीय जनता पार्टीच्या रजत जयंतीच्या वेळी अटलजींनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. हा अनेकांना मोठा धक्का होताद्रष्ट्या अटलजींना बहुधा, आतून काही जाणविले म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पुढे सोपविली. १९५०च्या दशकापासून राष्ट्रकार्यासाठी दिवसरात्र देशभर कधी पायी, कधी सायकलवरून, कधी स्वतः शिधा शिजवून, तर कधी स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरचं पिठलं-भाकरी खाऊन दशकानुदशके कामे करताना आपल्या या लाडक्या नेत्याच्या तब्येतीची किती हेळसांड झाली असेल, याची केवळ कल्पनाच केलेली बरी. ज्या काळात, सोईसुविधांच्या अभावात अटलजींनी काम केले, तो काळ त्यांच्याच नेतृत्वाने झालेल्या प्रगतीमुळे आता कल्पित वाटावा इतका मागे गेला आहे. विपरीत परिस्थितींवर मात करीत काम केल्याने देशाचे भले झाले, तरी स्वतः: अटलजींच्या प्रकृतीचे मात्र वाटोळे झाले. मनाच्या उभारीवर, कामाच्या जोशात देशकार्यासाठी स्वतः:ची केलेली हेळसांड आज दुर्दैवाने त्यांना त्रास देते आहे. अटलजींची तब्येत इतकी घसरावी की, ज्या अमोघ वाणीने वर्षानुवर्षे साऱ्या ना मंत्रमुग्ध केले, तिच अबोल व्हावी, या इतकी खरंतर नियतीची क्रूर चेष्टा नाही.

भारतरत्न सन्मानाने अटलजींसारखा विनम्र माणूस एरवीही निशब्धच झाला असता. अटलजींचा सहकारी म्हणून काम केल्यामुळे बहुधा, माझ्या मनातही दुर्दम्य आशावाद आहे.

हे प्रभो!

मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना

गैरों को गले लगा सकूँ

इतनी रुखाई

कभी मत देना।

 

असे अटलजी आयुष्य भर म्हणायचे...

 
- राम नाईक
राज्यपाल
उत्तर प्रदेश
 
 
 
(टीप - सदर लेख दै. मुंबई तरुण भारतच्या भारतरत्न अटलजी या विशेषांकात २६ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित करण्यात आला होता. तो लेख वाचकांसाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत.) 
@@AUTHORINFO_V1@@