नमामी सिंधु " सिंधु स्मरण दिवस ''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |

 
 
 
 
नमामी सिंधु " सिंधु स्मरण दिवस ''
जळगाव, 16 ऑगस्ट

नमामी सिंधु " -सिंधु स्मरण दिवस १२ रोजी झुलेलाल हाल जळगाव येथे साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद नवी दिल्ली,मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली, * *घनश्यमदास कुकरेजा नागपुर (संयोजक ) व भारतीय सिंधु सभा जलगाव तर्फे "नमामी सिंधु" सिंधु स्मरण दिवस कार्यक्रम 12 रोज़ी झूलेलाल सभागृहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे माजी आ. डॉ . गुरमुख जगवानी व सुरेश कूँदनानी ( महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुम्बई चे सदस्य व स्वानंद झारे ( राष्ट्रीय स्वयं सेवक संघ देवगिरी प्रान्त प्रचार प्रमुख ) होते .

भारत माता च्या प्रतिमेला माल्य अर्पण व दिप प्रज्वलित करून झाली कार्यक्रमाची सुरुवात झाली . याप्रसंगी कूँदनानी व झारे यानी सिंधु समरण दिवस या विषया वर मार्ग दर्शन केले . 14 अगस्त 1947 या दिवशी अखंड भारत चे दुर्भाग्य पूर्ण विभाजन होउन सिंध प्रांत भारत देश पासून वेगळा करण्यात आला . आपल्या सिंधी बांधवांवर खुप अत्याचार झाले त्याना आपले सर्वस्व सोडून भारतात विस्थतापित व्हावे लागले . अखंड भारताचे स्मरण केल्याने एक दिवस पुन्हा भारतापासून वेगळे झालेले भाग एकत्रीत होतील .आपण मना ने संकल्प करतों तो संकल्प पूर्ण करण्यात सम्पूर्ण ब्रम्हांड पण त्याला मदद करते .अशी भावना आहे असे त्यांनी स्पष्ट केले .

सिंधु नदी काठी आपली संस्कृती निर्माण झाली त्याची आठवन केली गेली. तसेच भारतात लेह मध्ये सिंधु नदी आहे . दर वर्षी जून महिन्यात सिंधु दर्शन यात्रा लेह लदाख येथे भारतीय सिंधु सभा तर्फे आयोजित केली जाते.,सिंधी बांधवानी त्याचा लाभ घ्यवा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश केसवानी यांनी तर सूत्रसंचलन संजय हिराणी यानी व आभार सचिव प्रेम कटारिया यानी मानले .

कार्यक्रमात महिला चा सहभाग लक्षणीय होता . नव निर्वाचित नगरसेवक भगत बालानी , मनोज आहूजा, लक्षमनदास आडवाणी , हीरानंद मघवानी रमेश मतानी ,सितालदास जवाहरानी ,टेकचंद पृथ्यानी, राजकुमार वालेचा, ब्रिजलाल मधवानी ,वासदेव तलरेजा, शंकरलाल तलरेजा ,तसेच उद्यागपती,व्यापारी, विविध पंचायत चे पदाधिकारी भारतीय सिंधुसभा चे सभासद व समाज बांधव मोठया संख्ये ने उपस्थित होते. वन्देमातरम ने कार्यक्रमा ची सांगता झाली .

कार्यक्रम यशस्वी करण्या साठी अजय चुग्रा, हरीश रायसिंघानी, जितु रावलानी, सितालदस जवाहरानी, अशोक खटवानी ,किशोर बहेरानी ,प्रेमा जवाहरानी ,रितु रायसिंघानी, रेशमा बहेरानी, दीपा भाटिया यांनी परिश्रम घेतले .


--
@@AUTHORINFO_V1@@