माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |

उपराष्ट्रपती नायडू आणि पंतप्रधान मोदींनीही घेतली भेट





नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून नुकतीच देण्यात आली आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झालेली नाही, त्यामुळे त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत  सुधारणा व्हावी, म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे  एम्सकडून सांगण्यात आले आहे. 

 
दरम्यान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वाजपेयी यांची नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी स्वतः एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचाराचा आढावा देखील घेतला.

देशभरात अटलजींसाठी प्रार्थना 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना आरोग्य लाभावे तसेच त्यांची प्रकृती स्थिर व्हावी, यासाठी देशभरात नागरिक यज्ञ-होम आणि परमेश्वराकडे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व वाजपेयी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 
वाजपेयी हे गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. गेल्या महिन्यामध्ये त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु थोड्याच दिवसात त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली होती. परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक ढासळल्यामुळे त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आल्याचे एम्सकडून सांगण्यात आले होते. 
 
@@AUTHORINFO_V1@@