राणीच्या बागेत जन्माला आला भारतातील पहिला पेंग्विन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : राणीच्या बागेत एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून हंबोल्ट पेंग्विन आहे. भारतात पहिल्यांदाच हंबोल्ट पेंग्विनचा जन्म झाला आहे. राणीच्या बागेतील मादी फ्लिपर आणि मोल्ट ही जोडी सोबत राहत होती. ५ जुलैला मादी फ्लिपरने अंडे दिले होते. त्या अंड्यातून आज पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला आहे.

 
 
 

नुकत्याच जन्माला आलेल्या पेंग्विनच्या पिल्लाची प्रकृती स्थिर असून त्याला आणखी १६ तास प्राणी संग्रहालयच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणा खाली ठेवण्यात येणार आहे. काही काळानंतर त्याचे लिंग तपासण्यासाठी त्याची डीएनए तपासणी केली जाणार आहे.

 

 
 

५ जुलै रोजी मादी फ्लिपरने हे अंडे दिले होते. फ्लिपर आणि मोल्ट दोघेही पेंग्विन या अंड्याला ऊब देत होते. यादरम्यान मादी फ्लिपरने ५ दिवस न खातापिता या अंड्याला जास्तीत जास्त ऊब दिली. पेंग्विनच्या जन्माची भारतातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील डॉक्टर सातत्याने विदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत होते.

 

जिजामाता उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले, "१५ ऑगस्टला ८ वाजता हंबोल्ट पेंग्विनच्या अंड्यातुन नव्या पेंग्विनचा जन्म झाला आहे. नवीन पिल्लू खुप ऍक्टिव्ह असून त्याची आई फ्लिपर त्याची काळजी घेत आहे."

@@AUTHORINFO_V1@@