तुटती बंधने संतांच्या दुरुशनें।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |

 

 

 
 
 
संतांच्या सहवासात, सेवेमध्ये शक्ती आहे. या प्रपंचामधील भवश्रम निघून जातात. इतर साधनं, श्रम करण्याची आवश्यकता नसल्याचं श्रीकृष्ण ठामपणाने सांगतात. शिवाय “मनातलं गूज तुला सांगतो आहे. तू ते आचरणात आण,” असं उद्धवाला सांगणारे ते परब्रह्माचे अवतार आहे.
 

संत एकनाथ महाराजांच्या अभंगगाथेतील अभंगाची ओळ संतसेवेचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे, संतसेवेची महती कथन करणारी आहे.

 

उद्धवा तू धर संतसमागम ।

तेणे भवश्रम हरे उद्धवा ॥

सांगतसे गूज मना धरी रे उद्धवा ।

आणिक श्रम वाया न करी रे तें ॥

 

संतांच्या सहवासात, सेवेमध्ये शक्ती आहे. या प्रपंचामधील भवश्रम निघून जातात. इतर साधनं, श्रम करण्याची आवश्यकता नसल्याचं श्रीकृष्ण ठामपणाने सांगतात. शिवाय “मनातलं गूज तुला सांगतो आहे. तू ते आचरणात आण,” असं उद्धवाला सांगणारे ते परब्रह्माचे अवतार आहे. संतांचा सहवास सुखाची प्राप्ती करून देतो, परंतु संत ओळखणं अवघड आहे. बाह्य वेषधारी संत नसतात. अंर्तबाह्य वैराग्य ज्यांचं झळकतं ते संत! ज्यांच्या जवळ सदैव आनंद नांदतो ते संत! दु:खाला दूर सारणारे संत! परमात्म्याशी संवाद साधणारे, समाधीसुखाचा सोहळा अनुभवणारे संत! सहनशील, सोशिक, संयमी असणारे संत सात्त्विकतेला उच्च शुद्ध सात्विकतेचा साज चढवतात ते संत! समाधानाचा सुगंध दरवळत ठेवणारे संत! अशा सुलक्षणांनी अलंकृत असणाऱ्या संतांच्या सेवेविषयी सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण उद्धवाला प्रत्यक्ष सांगतात,

 

उद्धवा स्वमुखे सांगे श्रीकृष्ण ।

संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥

 

संत एकनाथ महाराजांच्या अभंगगाथेतील अभंगाची ओळ संतसेवेचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे, संतसेवेची महती कथन करणारी आहे.

 

उद्धवा तू धर संतसमागम ।

तेणे भवश्रम हरे उद्धवा ॥

सांगतसे गूज मना धरी रे उद्धवा ।

आणिक श्रम वाया न करी रे तें ॥

 

संतांच्या सहवासात, सेवेमध्ये शक्ती आहे. या प्रपंचामधील भवश्रम निघून जातात. इतर साधनं, श्रम करण्याची आवश्यकता नसल्याचं श्रीकृष्ण ठामपणाने सांगतात. शिवाय “मनातलं गूज तुला सांगतो आहे. तू ते आचरणात आण,” असं उद्धवाला सांगणारे ते परब्रह्माचे अवतार आहे.

 

माझे जप तप अनुष्ठान ।

देव पूजा मंत्र पठण ।

नाना नेमादि साधन संत माझे उद्धवा॥

 

हे उद्धवा, माझी देवपूजा आणि मंत्रपठण म्हणजे संत होय. तू लक्षपूर्वक ऐक. माझे जप-तपदेखील आणि अनुष्ठान संतसेवा होय.

सकल साधन संतांच्या सेवेमध्ये सामावलेलं आहे. एकनाथ महाराज स्वत: संतपदी आरूढ झालेले असूनदेखील संतपूजन, संतसेवा, संतसहवास मानवी जीवनाला झळाळी देते असा स्वानुभव कथन करतात. पुढे संत एकनाथ महाराज सांगतात-

 

संतापोटी देव वसे ।

देवा पोटी संत असे॥

ऐसा परस्परें मेळा ।

देव संतांचा अंकिला ॥

संताठायी देव तिष्ठे ।

देव तेथे संत वसे ॥

एका जनार्दनी संत ।

देव तयांचा अंकित॥

 

संताच्या ठायी देव वास करतो. तसेच देवाच्या ठायी संत वास करतात. संत आणि देव एकमेकांसमवेत नांदतात. देव संतांचा अंकीत होऊन राहण्यात आनंद मानतो. देव, संत सहवासाचा भुकेला असतो. दोघांना एकमेकांशिवाय चैन पडत नाही. इतकी एकरूपता अन्यत्र सापडत नाही. जे दैवी गुण देवाच्या अंगी विलसतात, तेच गुण संतांच्या ठायी असतात. समस्त गुणांचा समन्वय या दोघांच्या ठायी नांदत असतो.

 

सामान्य समाजाला देवापर्यंत जाणं, संवाद साधणं शक्य नसतं. संत भूलोकीचे चालते-बोलते ईश्वर असतात. त्यामुळे संतांशी संवाद साधणं, देवाशी बोलल्यासारखं आहे. हे संवाद सुख संतांमुळे सामान्यांना प्राप्त होतं. दु:खाला वाट मोकळी होते. संकटसमयी हाक मारल्यावर संत सत्त्वर मदतीला येतात. संतांशी गूजगोष्टी करता येतात. सगळ्या भावना व्यक्त करण्याचं स्थान गवसतं. मनाची आंदोलनं जाणून संत जवळकीनं, प्रेमानं ही आंदोलनं थांबवतात. प्रारब्धाचे भोग भोगताना संत हळूवारपणानं कुरवाळतात. भोगाची तीव्रता कमी करतात. उंच उंच लाटा उठल्या तरी त्या शांत करतात. जीव घाबरा झाला तरी संत सावरतात. संतांचा महिमा व सामर्थ्य देव पूर्णपणे जाणून असतात. म्हणून देव संतांना भूलोकी पाठवतात.

 

संतांचा महिमा देवचि जाणें।

देवाची गोडी संतांसी पुसणें॥

 

एकनाथ महाराजांची अभंगरचना श्रेष्ठ दर्जाची आहे. त्यांच्यावर भगवंताची, देवाची पूर्ण कृपा होती. देव आणि संतांचं सुरेख नातं कसं असतं ते सांगत आहेत-

 

बहुत रंग उदक एक ।

यापरी देव संत दोन्ही देख ॥

संताविण देवा न कंठे घडी ।

उभयतां गोडी एक असे ॥

 

या नात्याला नाव कोणतं द्यावं? अनामिक असं हे ‘नातं’ आहे. ते अपार, अनंत आणि अतूट असं नातं आहे. युगानुयुगे ते अधिक घट्ट होत जातं. कलियुगात भक्तांनी या नात्याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे.

 

संतचरण रज लागता सहज।

वासनेचे बीज जळो जाय ॥

 

संतचरणांच्या रजकणांमुळे फार मोठी गोष्ट घडून येते. वासनांचं बीज नष्ट होऊन जातं. नुसतं नष्ट नाही, तर पूर्णपणानं जळून जातं. त्यामुळे पुनश्च जन्म घेण्याचा त्रास संपतो. जन्ममरणाच्या फेऱ्या तून सुटका होते. भगवंत व संत यांची गोडी आणि जोडी अलौकिक आहे. म्हणून सकल भक्तांनी याचं जन्मात याचं महत्त्व ओळखून आचरण करावं. मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या संतसेवेचा लाभ करून घेतला पाहिजे. म्हणजे जन्मोजन्मीच्या कर्मफळाची निवृत्ती होईल. वारंवार जन्म, गर्भवास याचा त्रास होणार नाही. दु:खाची निवृत्ती आणि अक्षय सुखाची प्राप्ती होईल.

 

जे या गेले संताशरण।

जन्ममरण चुकलें तया ॥

 

असे एकनाथ महाराज संत कृपावंत असून शरणागताचा उद्धार करतात, असं खात्रीपूर्वक कथन करतात. आपण याच जन्मामध्ये नरदेहाचं सार्थक साधून मोक्षापर्यंत जाण्याची संधी गमवण्यात काय अर्थ आहे?

- कौमुदी गोडबोले

@@AUTHORINFO_V1@@