अटलजींचा राजकीय प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |



 

 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभारत शोककळा पसरली असून देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक नजर त्यांच्या राजकीय प्रवासावर...
 

आर्य कुमार सभेच्या माध्यमातून ग्वाल्हेरमधून १९३९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश.

 

१९४२ मध्ये भारत छोडोचळवळीत सहभाग, अटक.

 

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत भारतीय जनसंघाचे काम.

 

१९५७ मध्ये बलरामपूर मतदारसंघातून संसदेत प्रवेश.

 

विरोधी पक्षात अभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय कारकीर्द.

 

आणिबाणीनंतर जनता पक्षाच्या तिकिटावर दिल्ली मतदारसंघातून संसदेत दाखल.

 

बहुमतातील जनता पार्टीच्या सरकारमध्ये मार्च, १९७७ ते जुलै. १९७९ या काळात परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम.

 

१९८० मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंह शेखावत यांच्यासोबत वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. भाजपाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना मिळाला.

 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार.

 

मे, १९९६ ते जून, १९९६ या केवळ १३ दिवसांसाठी पंतप्रधानपदी विराजमान. बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

 

मार्च, १९९८ ते मे, २००४ दरम्यान पुन्हा पंतप्रधानपद भूषविले.

 

अतिमहत्त्वाचे प्रमुख निर्णय

 

मे, १९९८ मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचणी घेतली.

 

१९९८ साली पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली-लाहोर बसने पाकला गेले.

 

१९९९ मध्ये कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची कामगिरी.

 

काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाचे अपहरण झाल्यानंतर तीन दहशतवाद्यांच्या बदल्यात सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका.

@@AUTHORINFO_V1@@