नक्षलमुक्त भारताकडे वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |

नक्षलवाद मोठया प्रमाण घटला; मोदींनी दिली लाल किल्ल्याहून माहिती

१२६ जिल्ह्यांहून नक्षलवाद आता अवघ्या ९० जिल्ह्यांवर 




नवी दिल्ली : गेल्या ६० वर्षांपासून देशाला आतमधून पोकरत असलेल्या नक्षलवाद गेल्या चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली आहे. लाल किल्ल्यावरील आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये आज त्यांनी याविषयी माहिती दिली असून गेल्या चार वर्षांमध्ये देशातील तब्बल ३६ जिल्ह्यांमधील नक्षलवाद नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणाच्या शेवटी आपल्या सरकारच्या कामगिरीवर बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली. नक्षलवाद हा गेल्या अनेक वर्षांपासून देशाला रक्तबंबाळ करत होता. परंतु सध्याचे केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त भागातील राज्य सरकारांनी गेल्या चार वर्षांमध्ये राबवलेल्या वेगवेगळ्या नक्षलविरोधी मोहिमा, नागरिकांशी संपर्क करण्याचे प्रयत्न आणि विकास कामे या त्रिसूत्रीमुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात घटल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी आकडेवारी देताना १२६ जिल्ह्यांमध्ये या अगोदर पसरलेला नक्षलवाद आज ९० जिल्ह्यांवर येऊन पोहोचला आहे, असे त्यांनी जाहीर केले. तसेच अजूनही नक्षलवादाविरोधात आणखी काही मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पंतप्रधानांनी आज दिलेल्या या माहितीमुळे गेल्या अनेक वर्षपासून देशाच्या विकासाला बाधक ठरत असलेला नक्षलवाद आता नष्ट होत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याहून याविषयी घोषणा केल्यामुळे नक्षलग्रस्त भागामध्ये घाबरून राहत असलेल्या सामान्य नागरिकांना देखील आता जगण्यासाठी एक नवे बळ प्राप्त होईल.
@@AUTHORINFO_V1@@