गाडेगावात आज वैष्णवांची मंदियाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |
 
 

गाडेगावात आज वैष्णवांची मंदियाळी

जामनेर, 14 ऑगस्ट
खान्देशात वारकरी सांप्रदायाची पताका फडकविण्यात मोलाचा वाटा असणारे वै.ह.भ.प.संत तोताराम महाराज यांच्या 89 व्या पुण्यतिथी निमित्त जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे आज 15 ऑगस्ट रोजी वैष्णवांची मंदियाळी असणार आहे.
 
 
गाडेगाव येथील वै.ह.भ.प.संत तोताराम महाराज यांनी वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांना नागपंचमी च्या दिवशी देवज्ञा झाली. त्यांची समाधी गावालगत औरंगाबाद रोडवर आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहाचा समारोप नागपंचमीच्या दिवशी होतो. महाप्रसादाचा कार्यक्रम भव्य असतो वारकरी सांप्रदायाचे सुमारे 15 ते 20 हजार भाविक नागपंचमीला समाधीस्थळी दर्शनासाठी येत असतात. यासर्व भाविकांची भोजन व्यवस्था केली जाते.
 
श्रीमद भागवत सप्ताहाच्या 7 दिवसात सकाळच्या नाश्तापासून दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था दात्यांकडून समाधीस्थळी केली जाते. याकालावधीत गाव पंगत देण्यासाठी भलीमोठी प्रतिक्षा यादी असते. नागपंचमीच्या दिवशी बाहेरगावाहून आलेले भाविकांचे भोजन झाल्या शिवाय ग्रामस्थ भोजन करत नाहीत असा येथील पायंडा आहे. नागपंचमीला अन्नदान करणा-या दात्यांची प्रतिक्षा यादी मोठी आहे.
 
नागपंचमीला येथे पडतो पाऊस
नागपंचमीला वै.ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर हे काल्याचे किर्तन करत असतांना वरुणाचे आगमन व्हायचे. आजरोजी नागपंचमीला थोडा तरी पावसाचा शिडकाव येथे होतच असतो.
 
 
8 ऑगस्ट रोजी समाधी स्थळी श्रीमद भागवत सप्ताह सुरु झाला असून ह.भ.प.दिनकर महाराज(जळगाव) हे भागवत कथा वाचक आहेत. तर ह.भ.प.गोविंद महाराज केकत निंभोरा, ह.भ.प.परमेश्वर महाराज (जळगाव), ह.भ.प.लक्ष्मण महाराज (गाडेगाव), ह.भ.प.पांडुरंग महाराज(आवार), ह.भ.प.दत्तात्रय महाराज(साकरी), ह.भ.प.चंद्रकांत महाराज (साकरी), ह.भ.प.सुधाकर महाराज (मेहूण), ह.भ.प. भरत महाराज(बेळी) व 15 रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प.धनराज महाराज ( निंभोरा ) यांच्या किर्तनाचे कार्यक्रम होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@