सुट्टी मिळत नसल्याने त्याने उचलले टोकाचे पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |

 

 
 
शिर्डी : मुंबई-शिर्डी फास्ट पॅसेंजर ट्रेनखाली आज सकाळी एका रेल्वे कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. राहुरीतील वांबोरी येथे ही घटना घडली आहे. बबलू कुमार असे या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात राहणारा होता. मध्य रेल्वेच्या सोलापूरच्या विभागीय कार्यालयात बबलू कुमार हा ट्रॅकमन म्हणून कार्यरत होता.

 

गेल्या दीड वर्षांपासून त्याला सुट्टी मिळाली नव्हती. सुट्टीसाठी अर्ज केल्यानंतर त्याला कार्यालयातून हाकलून देण्यात आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी बबलूने स्वत:चा एक व्हिडिओ काढला होता. गेल्या दीड वर्षापासून सुट्टी मिळत नसल्याने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तो आत्महत्या करत आहे. हे त्याने व्हिडिओत स्पष्ट केले आहे. बबलू हा नोकरीसाठी आपल्या कुटुंबियांपासून दूर राहत होता. त्यामुळे नोकरी करून काय उपयोग आहे?. असा प्रश्न त्याने व्हिडिओत उपस्थित केला. सहकाऱ्यांनी बबलूला रोखण्याच्या खूप प्रयत्न केला. परंतु बबलू ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. व्हिडिओत शेवटी बबलूने ‘हा व्हिडिओ रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवा’ असे सांगितले. जेणेकरून त्यांना कळावे की रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी कशाप्रकारे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात.
 

 

 

 
 
बबलू कुमारच्या आत्महत्येमुळे मात्र सोलापूरमधील इतर रेल्वे कर्मचारी संतप्त झाले आहेत. या संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी आज रेल रोको केला. त्यांनी म्हैसुर-वाराणसी एक्सप्रेस अडवली. घटनास्थळी सहाय्यक अभियंते पोहोचले असता त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. बबलू कुमारच्या आत्महत्येबाबत रेल्वेने त्याला सुट्टी मंजूर केली होती. अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@