नवभारत हेच नवयुग : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |



नवी दिल्ली : भारत सध्या सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. देशातील सर्व नागरिक संपूर्ण देशाला एकत्र करण्याचा आणि एका अत्युच्च पदावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे भारताची प्रगती आता कधीच थांबणार नाही, कारण हाच नव भारत असून नव भारत हेच नवयुग आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले आहे. देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमामध्ये आज ते बोलत होते.

भारताकडे दुर्दम्य अशी इच्छाशक्ती आहे. गेल्या चार वर्षांमध्ये भारताने अनेक मोठमोठे आणि कठीण निर्णय घेतले आहेत. तसेच हे सर्व निर्णय यशस्वी देखील केले आहेत. त्यामुळे आज जगभरातील देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. एकेकाळी भारताच्या अर्थव्यवस्थेला नावे ठेवणारे लोक आज भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक करत असून हे सर्व देशातील नागरिकांच्या इच्छाशक्ती शक्य झाले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.



नागरिकांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल


गेल्या चार वर्षांमध्ये देशातील सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये मोठा अमुलाग्र बदल झाला असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारने सुरु केलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांमुळे आणि विशेषतः मुद्रा योजनेमुळे अनेक सामान्य आणि गरीब कुटुंबांचे जीवन बदलले आहे, असे त्यांनी म्हटले. अजून देखील भारत कृषी ते माहिती तंत्रज्ञानपर्यंत प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे, असे त्यांनी सांगितले.





तिहेरी तलाक विधेयक लागू होणारच


आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी 'तिहेरी तलाक' वर देखील भाष्य केले. तिहेरी तलाकच्या अमानुष प्रथेमुळे आजपर्यंत अनेक मुस्लीम महिलांचे जीवन नष्ट झाले आहे. तसेच अजूनही अनेक महिला या तिहेरी तलाकच्या भीतीखाली जगत आहेत. सध्याचे सरकार हे देशातील सर्व महिलांच्या स्वाभिमानाची आणि विकासाची इच्छा धरून काम करत आहे. त्यामुळे तिहेरी तलाकवर बंदी घालण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आहेत. परंतु काही लोक अजूनही तिहेरी तलाकला पाठींबा देत आहेत. परंतु काहीही झाले तरी तिहेरी तलाक विधेयक लागू करू, असे आश्वासन देखील मोदींनी यावेळी दिले.






पंतप्रधान मोदींचे संपूर्ण भाषण :


@@AUTHORINFO_V1@@