राज्यातील ५१ पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |




मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील पोलीस जवानांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहे. देशातील एकूण ९४३ पोलीस जवानांना ही पदके जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील ५१ पोलीस जवानांचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नुकतीच याविषयी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील एकूण ५१ पोलिसांचा समावेश आहे. ज्यातील ८ पोलीस जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. तसेच ३ कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ४० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी म्हणून राष्ट्रपती पदके देण्यात आली आहेत.

याचबरोबर स्वातंत्र्यदिनानिमित्त ३६ तुरुंग अधिकाऱ्यांना देखील सुधारक सेवा पदके प्रदान करण्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यामध्ये असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सुधारक सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवेसाठी ३१ सुधारक सेवा पदकांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत. पुणे, मुंबई आणि नागपूरमधील पोलीस जवानांना ही पदके मिळाली आहेत.
 

पदके मिळालेल्या पोलीस जवानांची यादी  : 

 
 
@@AUTHORINFO_V1@@