कल्याण - डोंबिवलीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |



कल्‍याण - ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवलीत विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . तर शासकीय कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात सम्पन्न झाले

 

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत मुख्‍यालयात महापौर विनिता राणे यांचे हस्‍ते आणि आयुक्‍त गोविंद बोडके व इतर मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत ध्‍वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त विजय पगार, धनाजी तोरस्कर, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, पालिका सदस्य प्रकाश पेणकर, मोहन उगले व इतर लोक प्रतिनिधी उपस्थित होते तर डोंबिवली विभागीय कार्यालय येथे उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे हस्‍ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्‍त सुरेश पवार व इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याच बरोबर डोंबिवली येथील ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रिडा संकुलातील कॅ. विनय सचान स्‍मारकास महापौर व आयुक्त यांचे हस्‍ते पुष्‍पचक्र अर्पण करण्‍यात आले. या प्रसंगी विरोधी पक्षनेते मंदार हळबे , सर्व प्रभाग अधिकारीआदी उपस्थित होते. याच बरोबर शिक्षण सभापती विश्वदीप पवार यांनी डोंबिवलीतील महापालिकेच्या शाळेत ध्वजारोहण केले तसेच येथील विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले . गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते .तसेच लोकप्रतिनिधीच्या वतीने त्यांच्या प्रभागात ही या निमित्ताने ध्वजारोहण केले

 

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंड परिसरात राहणाऱ्या नेहा कांबळे, पूनम कांबळे, संध्या गायकवाड, विनीत गायकवाड, प्रताप घुले, कोमल कासार, प्रीती ढगे, प्रभाकर घुले आणि राहुल साबळे या मुलांच्या केम्ब्रिआ शाळेमध्ये ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शाळेमध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात या मुलांना शालेयोपयोगी वस्तू देऊन कौतूकही करण्यात आले. तर कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता देशासाठी झटणाऱ्या, बलिदान देणाऱ्या देशातील गुप्तहेरांवर आधारित नाट्य सादर करीत त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@